तारक मेहता मालिकेत पुनरागमन करणार सोढी? असित कुमार मोदींची भेट घेत अभिनेत्याने…

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. तारक मेहता मालिकेला गेल्या काही वर्षांपासून जुने कलाकार हे सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. काही कलाकारांनी तर मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोपही केले आहेत.

तारक मेहता मालिकेत पुनरागमन करणार सोढी? असित कुमार मोदींची भेट घेत अभिनेत्याने...
Asit Kumarr Modi and Gurucharan Singh
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 12:38 PM

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग हा तब्बल 25 दिवस बेपत्ता होता. गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्यानंतर त्याचे पालक आणि चाहते चिंतेत होते. तारक मेहता का उल्टा चश्माच्या टीमने देखील गुरुचरण सिंगसाठी प्रार्थना केली. मुंबईला जातो म्हणून गुरुचरण सिंग हा घरातून निघाला आणि तो मुंबईला आलाच नाही. त्यानंतर 25 दिवसांनंतर तो घरी परतला आणि त्याने सांगितले की, त्याला वापस यायचेच नव्हते. परंतू आई वडिलांमुळे तो परत आला. 25 दिवसांमध्ये आपण कुठे होतो, याचीही सविस्तर माहिती त्याने पोलिसांना दिली.

गुरुचरण सिंग हा आर्थिक तंगीत असल्याचे सांगितले जात होते. तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो त्याने 2020 मध्येच काही खासगी कारणांमुळे सोडला. आता गुरुचरण सिंग याच्याकडे काही काम नाहीये. तारक मेहता मालिका सोडल्यानंतर त्याने अनेक व्यवसाय केले. मात्र, त्याला कशातच यश मिळाले नाही.

आता नुकताच गुरुचरण सिंग हा तारक मेहता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांना भेटण्यासाठी आला. यामुळेच गुरुचरण सिंग हा परत तारक मेहता मालिकेत परतणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. यावर बोलताना गुरुचरण सिंग म्हणाला की, मला माहिती नाही की, पुढे काय होणार बघू काय काय होते ते…

सोढीसोबतच्या भेटीवर असित कुमार मोदी हे म्हणाले की, सोढी माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे. खूप वर्ष तो आमच्यासोबत जोडला गेला होता. सोढीने काही खासगी गोष्टींमुळे शो सोडला होता. जेंव्हाही तो मुंबईमध्ये येतो, त्यावेळी मला भेटतो. जेंव्हा तो बेपत्ता झाला होता, त्यावेळी मी खूप जास्त टेन्शनमध्ये होतो.

त्यावेळी मी टेन्शनमध्ये त्याला मेसेज देखील केला होता. तो माझ्या ऑफिसमध्ये आला होता. आम्ही काही गोष्टींवर बोललो. मी भविष्यासाठी सोढीला शुभेच्छा देतो. सोढी याने असित कुमार मोदी यांची भेट घेतल्याने आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. सोढी तारक मेहताच्या मालिकेत पुनरागमन करू शकतो.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.