मुंबई – प्रत्येक कलाकारांच्या वाटेला वेगवेगळ्या भूमिका येत असतात. प्रत्येक भूमिकेला न्याय देणाचं काम कलाकार असतो. एखादी व्यक्ती आपल्याला खटकते किंवा आपल्या विचाराची नसते त्यामुळे तिची भूमिका साकारायला कुठलाही नकार देत नाही, ती तितकीच ताकदीने केली जाते. अशीचं भूमिका 2017 साली शिवसेनेचे खासदार अमोल कोल्हे (amol kolhe) यांच्या वाटेला आली. नथुराम गोडसेंची (naturam godse) भूमिका मी तितकीच ताकदीने केली असल्याची कबुली आज अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टच्या (facebook post) माध्यमातून दिली आहे.
2017 साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर लवकरचं प्रदर्शित होणार आहे. त्यावर अनेकांनी अमोल कोल्हे यांना डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? असं विचारल्यानंतर त्यांनी “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्याचं उदाहरण दिलं आहे. या वाक्यातील नकारात्मकता बाजूला ठेऊन सकारात्मका घ्या असा सल्ला त्यांनी चाहत्यांना दिला आहे. तसेच त्यांनी “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक सुध्दा सांगितला आहे.
“कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातचं आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो. त्या भूमिका साकारताना समाधानही मिळतं, परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही. तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा! याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा! अशी पोस्ट अमोल कोल्हे यांनी फेसबुकला टाकली आहे. ही पोस्ट अत्यंत कमी कालावधी व्हायरल झाली आहे.
नेमकं काय म्हणालेत अमोल कोल्हे