रणवीर अलाहबादियाच्या अश्लील टिप्पणीमुळे ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो वादात सापडला. ज्यामुळे शोचा कर्ताधर्ता समय रैना याच्या अडचणीत देखील मोठी वाढ झाली. रणवीर अलाहबादिया हे प्रकरण अद्याप चर्चेत असताना कॉमेडी विश्वातून आणखी एक वादग्रस्त प्रकरण समोर आलं आहे. ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विनोदवीर कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कवीता रचत त्यांना गद्दर म्हटलं आहे. ज्यामुळे आता कुणाल याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
समय रैना आणि कुणाल कामरा यांच्यामुळे सध्या वादावरण तापलं आहे. पण दोघांमध्ये एक व्यक्ती अशी आहे, जी पुन्हा चर्चेत आली आहे. ती व्यक्ती आहे हॅबिटेट ग्रुपचे मालक बलराज सिंग घई… बलराज सिंग घई यांना तुम्ही समय रैना याच्या शोमध्ये अनेकदा पाहिलं असेल. कॉमेडी सोबत बलराज सिंग घई महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कोन बनेगा करोडपती’ शोमध्ये देखील दिसतो.
समय रैनाच्या शोवर झालेल्या गदारोळातही बलराज सिंग घईच्या हॅबिटॅट ग्रुपचं नाव चर्चेत होतं आणि त्यांना पुन्हा एकदा कुणाल कामरा याच्या राजकीय व्यंगाचा फटका बलराजला सहन करावा लागला. या दोन्ही वादांचा हॅबिटॅट ग्रुपचे मालक बलराज सिंग घई यांच्याशी विशेष संबंध आहे. कारण दोन्ही वेळा कॉमेडी शोवरून गदारोळ झाला तेव्हा शोचं ठिकाण हॅबिटॅट ग्रुप होते.
कुणाल याच्या विनोदाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शोचं ठिकाणी तोडफोड करण्यात आली. ज्यामुळे हॅबिटॅट ग्रुपचं मोठं नुकसान झालं आहे. याच कारणमुळे हॉलच्या मालकांनी हॉल अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बलराज सिंग घईने सोशल मीडियावर पोस्ट करत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
हॅबिटॅट ग्रुपच्या अधिकृत हँडल आणि त्याच्या वैयक्तिक इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करून बलराज सिंग घई यांनी क्लबवरील हल्ल्याचा निषेध केला आणि कुणाल कामरा यांच्या वादाशी आपला कोणताही संबंध नाही… असं म्हटलं आहे. ‘झालेल्या हल्ल्यांमुळे आम्ही चिंतेत आहोत. कलाकार स्वतः त्यांच्या विचारांसाठी आणि रचनासांठी जबाबदार आहेत. याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही कोणत्याच कलाकारच्या कंटेंटमध्ये सामिल नाही. परंतु नुकताच घटनांनी आम्हाला पुनर्विचार करण्यास भाग पाडलं आहे की प्रत्येक वेळी आम्हाला दोष दिला जातो आणि लक्ष्य केलं जातं जसं की आम्ही कंटेंट तयार केलं आहे.’
सिंग पुढे म्हणाला, ‘आम्हाला किंवा आमच्या मालमत्तेला यापुढे कोणताही धोका नाही याची खात्री होईपर्यंत आम्ही क्लब बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमची मालमत्ता धोक्यात न घालता आम्हाला मुक्त अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ मिळेपर्यंत आम्ही परतणार नाही. कलाकारांसाठी कोणत्याही भाषेत त्यांचं काम प्रदर्शित करण्यासाठी हॅबिटॅट हे नेहमीच एक उत्तम व्यासपीठ राहिलं आहे.’ असं देखील बलराज सिंग घई म्हणाला.