Chirag Paswan | वयाच्या 41 व्या वर्षी कॅबिनेट मंत्री, किती शिकले आहेत चिराग पासवान?
Chirag Paswan | मोदी सरकारमधील तरूण चेहरा, वयाच्या 41 व्या कॅबिनेट मंत्री, किती शिकले आहेत चिराग पासवान? सध्या सर्वत्र चिराग पासवान यांची चर्चा रंगली आहे. आता त्यांच्या जुन्या सिनेमांचे देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत...
Chirag Paswan | लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वत्र हाजीपूरचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांची चर्चा रंगू लागली. सोशल मीडियावर देखील चिराग पासवान यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत… तर मोदी सरकारमधील तरुण मंत्री चिराग पासवान यांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊ. हाजीपूरचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान तुफान चर्चेत आहेत.
सोशल मीडियावर फक्त आणि फक्त चिराग पासवान यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चिराग पासवान यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1982 मध्ये दिल्ली येथे झाला. चिराग पासवान यांनी इंजीनियरिंग ग्रेज्यूएट आहेत. राजकारण प्रवेश करण्यापूर्वी चिराग पासवान बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. पण अभिनय विश्वात त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिले ना मिले हम’ सिनेमात चिराग पासवान आणि कंगना रनौत यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली.
View this post on Instagram
सिनेमांमध्ये करिअर केल्यानंतर, चिराग यांनी बिहारच्या राजकारणात प्रवेश केला आणि 2014 मध्ये लोक जनशक्ती पार्टीसाठी जमुई मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यानंतर 2019 मध्ये चिराग पुन्हा एकदा जमुई जागेवरून खासदार म्हणून निवडून आले आणि आता 2024 मध्ये मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले आहेत.
चिराग पासवान यांनी बुंदेलखंड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून कंप्यूटर सायन्समधून बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. फक्त इंजीनियरिंग नाही तर, चिराग पासवान यांनी फॅशन डिझायनिंगचा कोर्स देखील केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने 2003 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमधून 10वी आणि 12वीपर्यंत शिक्षण घेतलं.
View this post on Instagram
चिराग पासवान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते रामविलास पासवान यांचे पूत्र आहेत. यावेळी एलजेपीकडून 5 जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आणि चिराग यांनी पाचही जागा जिंकून पंतप्रधान मोदी यांना दिल्या. यामुळेच चिराग पासवान यांनी एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.