Junior Mehmood यांच्या निधनामुळे ‘या’ व्यक्तीला बसलाय मोठा धक्का, दोघांमध्ये होतं खास कनेक्शन
Junior Mehmood : लहानपणीच्या मित्राला जाताना पाहून 'या' व्यक्तीला बसलाय मोठा धक्का, ज्युनियर महमूद यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा... अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी
मुंबई | 9 डिसेंबर 2023 : अभिनेते ज्युनियर महमूद (Junior Mehmood) यांच्या निधनामुळे अनेकांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ज्युनियर महमूद कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर टाटा मेमोरियल रुग्णालयात रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी ज्युनियर महमूद यांच्याकडे फक्च 40 दिवस असल्याचं सांगितलं होतं. अखेर ज्युनियर महमूद यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. मृत्यूआधी अनेक सेलिब्रिटी देखील ज्युनियर महमूद यांना भेटण्यासाठी आले. जॉनी लिव्हर, जितेंद्र, सचिन पिळगावकर यांनी ज्युनियर महमूद यांची शेवटची भेट घेतली. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
ज्युनियर महमूद यांच्या निधनामुळे चाहते आणि अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. अनेक जण ज्युनियर महमूद यांच्या निधनानंतर दुःख देखील व्यक्त करत आहेत. आता ज्युनियर महमूद यांचे खास मित्र आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सोशल मीडिया पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे.
दिग्दर्शक हंसल मेहता यांनी 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारी’ सिनेमाची एक क्लिप पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ज्युनियर महमूद ‘हम काले है तो क्या हुआ’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. लहानपणीचा फोटो पोस्ट करत हंसल मेहता म्हणाले, ‘ज्युनियर महमूद यांचा क्यूटनेस आणि हासू कायम स्मरणात ठेवेल… तो माझ्या बालपणाचा अविभाज्य भाग होते.. आरआयपी ज्युनियर महमूद…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ज्युनियर महमूद यांची चर्चा रंगत आहेत.
ज्युनियर महमूद यांचं खरं नाव..
ज्युनियर महमूद यांचं खरं नाव नईम सैय्यद असं होतं. ज्युनियर महमूद यांनी ‘हम काले हैं तो क्या हुआ…’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आणि गायम महमूद यांच्या मनावर राज्य केलं. तेव्हा महमूद यांनी नईम सैय्यद यांना ज्युनियर महमूद असं नाव दिलं. तेव्हापासून नईम सैय्यद यांनी देखील ज्युनियर महमूद म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
ज्युनियर महमूद सिनेमे
ज्युनियर महमूद यांनी ‘नौनिहाल’ (1967), ‘ब्रह्मचारी’ (1968), ‘कटी पतंग’, ‘आन मिलो सजना’ (1970), ‘कारवां’, ‘हाथी मेरे साथी’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘आप की कसम’, ‘अमीर गरीब’ (1974), ‘गीत गाता चल’ (1975), ‘शहजादे’ (1989), ‘आज का अर्जुन’ (1990), ‘जुदाई’ (1997), ‘जर्नी बॉम्बे टू गोवा’ (2007) यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांचं मनोरंजन केलं.