Hansika Motwani | वयापेक्षा मोठं दिसण्याआधी हंसिकाने घेतले होते हार्मोनल इंजेक्शन्स? स्वत:च सोडलं मौन

फक्त हंसिकाच नाही तर तिच्या आईनेही या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. हंसिकाची आई स्वत: एक डर्मेटोलॉजिस्ट आहेत. मुलीबद्दलच्या या अफवांमुळे सुरुवातीला खूप वाईट वाटायचं असं त्या म्हणाल्या होत्या.

Hansika Motwani | वयापेक्षा मोठं दिसण्याआधी हंसिकाने घेतले होते हार्मोनल इंजेक्शन्स? स्वत:च सोडलं मौन
Hansika MotwaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 9:43 AM

मुंबई : बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘कोई मिल गया’मधील तिची भूमिका प्रेक्षकांना आजही चांगलीच लक्षात असेल. त्यानंतर तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. एकीकडे हंसिका जेव्हा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत होती, तेव्हा तिच्याविषयी अजब अफवा पसरू लागल्या होत्या. हंसिकाची आई मोना मोटवानी यांनी तिला हार्मोनल इंजेक्शन दिले होते, अशा चर्चांना उधाण आलं होतं. ती लवकरच मोठी व्हावी किंवा मोठी दिसावी यासाठी तिला हे इंजेक्शन्स देण्यात आले, असं म्हटलं जात होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर या चर्चांवर अखेर हंसिकाने मौन सोडलं आहे.

90 च्या दशकात हंसिका मोटवानी ‘शका लका बूम बूम’ या लोकप्रिय मालिकेत झळकली होती. याशिवाय तिने हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. मात्र ती जेव्हा चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून झळकू लागली, तेव्हा लोकांना ते अशक्य वाटलं. हंसिकाच्या आईने तिला हार्मोन्सचे इंजेक्शन्स दिले, अशी चर्चा सुरू झाली.

हे सुद्धा वाचा

या अफवांवर उत्तर देत हंसिका म्हणाली, “मी तर आजसुद्धा कोणतंच इंजेक्शन घेऊ शकत नाही. मला सुईची भिती वाटते म्हणून मी टॅटूसुद्धा काढू शकली नाही. कोणतीही आई असं का करेल? यावरून हे स्पष्ट होतंय की मी करिअरमध्ये पुढे गेल्याने काही लोकांना ईर्षा वाटू लागली. पण ठीक आहे, कदाचित मी काहीतरी चांगलंच केलं असेन, ज्यामुळे लोक माझ्याबद्दल चर्चा करत आहेत. त्यामुळे त्यांना चर्चा करत राहू दे.”

View this post on Instagram

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

फक्त हंसिकाच नाही तर तिच्या आईनेही या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. हंसिकाची आई स्वत: एक डर्मेटोलॉजिस्ट आहेत. मुलीबद्दलच्या या अफवांमुळे सुरुवातीला खूप वाईट वाटायचं असं त्या म्हणाल्या होत्या. अशा अफवा पसरवणाऱ्यांना त्यांनी सवाल केला, “मार्केटमध्ये खरेच असे इंजेक्शन्स असतात का? जर असते तर मी स्वत: गरजूंना ते विकले असते आणि श्रीमंत झाली असती. कोणती आई तिच्या मुलीसाठी असं काम करेल? तुम्हीच विचार करा की असं कोणतं इंजेक्शन असतं का ज्यामुळे हाडं लांब होतात?”

हंसिकाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जयपूरमधील मुंडोटा फोर्ट अँड पॅलेस याठिकाणी लग्न केलं. बिझनेसमन सोहैल कठुरियाशी तिने लग्नगाठ बांधली. सोहैलचं हे दुसरं लग्न आहे. 2016 मध्ये सोहैलने रिंकी नावाच्या तरुणीशी लग्न केलं होतं. गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.