Ajay Devgan याला मारण्यासाठी जमली अनेकांची गर्दी; ‘त्या’ व्यक्तीमुळे वाचले अभिनेत्याचे प्राण
अजय देवगण याने असं काय केलं ज्यामुळे अभिनेत्याला मारण्यासाठी जमली लोकांची गर्दी; पण 'त्या' व्यक्तीच्या निर्णयामुळे वाचले अजयचे प्राण
मुंबई : अभिनेता अजय देवगण याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनात स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं. आज अभिनेत्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्याला मारण्यासाठी अनेकांची गर्दी जमली आणि अभिनेता काहीही करु शकत नव्हता. पण त्या एका व्यक्तीने उचललेल्या पाऊलामुळे अजयला कोणीही मारलं नाही. या गोष्टीचा खुलासा खुद्द अभिनेत्याने एका मुलाखती दरम्यान केला. त्या घटनेनंतर अभिनेता तुफान चर्चेत आला होता. हा किस्सा अजयच्या कॉलेजच्या दिवसांचा आहे. तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, अजयने असं काय केलं ज्यमुळे लोकांनी अजयला मारण्यासाठी गर्दी केली.
अभिनेत्याने सांगितलं की, तो कॉलेजच्या दिवसांमध्ये फार मस्तीखोर होता. अभिनेत्याकडे एक कार होती. कारमध्ये अभिनेता कायम त्याच्या मित्रांसोबत फिरायचा. एकदा अभिनेता त्याची कार घेवून मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होता. तेव्हा भरधाव वेगात येणाऱ्या अजयच्या कारसमोर एक लहान मुलगा आला आणि तो प्रचंड घाबरला.
तेव्हा तेथील जमलेल्या सर्व लोकांनी अजयच्या कारला चारही बाजून घेरलं. अभिनेत्याला गाडीतून बाहेर येण्यासाठी सांगितलं. त्यानंतर जमलेल्या लोकांनी अजयला मारण्यास सुरुवात केली. या गोष्टीची माहिती अयजचे वडील वीरू देवगण यांच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा अभिनेत्याच्या वडिलांनी २०० फायटर्स लोकांना मुलाला वाचवण्यासाठी पाठवलं.
२०० फायटर्स लोकांना पाहून अजयला मारण्यासाठी जमलेले लोक घाबरले आणि बाजूला झाले. त्यानंतर खुद्द वीरू देवगण त्याठिकाणी मुलाला वाचवण्यासाठी पोहोचले. अशा प्रकारे मुलाला वाचवण्यासाठी २०० फायरटर्स लोकांना पाठवण्याचा निर्णय अभिनेत्याच्या वडिलांनी घेतला.
असे अनेक किस्से अजय त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. २ एप्रिल १९६९ साली जन्म झालेल्या अभिनेत्याने ‘फुल और कांटे’ सिनेमाच्या माध्यमातून चाहच्यांच्या मनात राज्य केलं. त्यानंतर अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. सध्या अभिनेता ‘भोला’ सिनेमासाठी चर्चेत आहे. अभिनेत्याचा भोला सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करताना दिसत आहे.
त्यामुळे येत्या दिवसांत अजय देवगण स्टारर ‘भोला’ सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा आहे. कारण आज अजय मोठ्या थाटात स्वतःचा वाढदिवस साजरा करत आहे.
अजय कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. अजय कायम आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत दिसतो. शिवाय अभिनेत्याची मुलगी न्यासा देवगण देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.