Amitabh Bachchan: जेव्हा ऐश्वर्या रायमुळे अमिताभ बच्चन यांचं फिटलं इतकं मोठं कर्ज, ‘ही’ व्यक्ती झाली मालामाल

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्यावर होतं कर्जाचं डोंगर, ऐश्वर्या राय हिच्यामुळे अमिताभ बच्चन यांचं फिटलं कोट्यवधींचं कर्ज, तेव्हा बच्चन कुटुंबाची सून नव्हती अभिनेत्री, फार कमी लोकांना माहिती आहे सत्य

Amitabh Bachchan: जेव्हा ऐश्वर्या रायमुळे अमिताभ बच्चन यांचं फिटलं इतकं मोठं कर्ज, ‘ही’ व्यक्ती झाली मालामाल
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 9:19 AM

महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज वयाच्या 81 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी बक्कळ पैसा कमावला. बिग बी आज त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. पण एक काळ असाही होता जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यावर कर्जाचं डोंगर होतं आणि कर्ज फेडण्यासाठी बिग बी असमर्थ होते.

एका मुलाखतीत कर्जाबद्दल खुद्द अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला होता. बिग बींच्या कंपनीचा 1990 साली दिवाळा निघाला होता. त्यांच्यावर तब्बल 90 लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं. तेव्हा बिग बी म्हणाले होते, ‘‘संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात आली होती. कारण मी कंपनीचा वैयक्तिक हमीदार होतो, हमीदार म्हणून पैसे देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मला 90 कोटी रुपये द्यावे लागले….’

अमिताभ बच्चन यांच्या वाईट काळात दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मदत केली. यश चोप्रा यांनी अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय स्टारर ‘मोहब्बतें’ सिनेमात अमिताभ बच्चन यांना कास्ट केलं. सिनेमात ऐश्वर्या राय असल्यामुळे चाहत्यांनी देखील अभिनेत्रीला पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी केली होती. तेव्हा ‘मोहब्बतें’ सिनेमाने जवळपास 41 कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमा केला.

सिनेमाला मिळालेल्या यशानंतर बिग बी यांचं कर्ज फिटलं असं देखील सांगण्यात येत. शिवाय निर्माते देखील ‘मोहबतें’ सिनेमामुळे मालामाल झाल्याची माहिती समोर आली होती. तेव्हा ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून नव्हती. सिनेमात अभिनेत्रीने ‘मेघा’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.

‘मोहब्बतें’ सिनेमाला यश मिळाल्यानंतर बिग बी यांनी ‘कोन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट आणि प्रोड्यूस करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे बिग ही यांच्या करियरला नवीन वळण मिळालं… आज बिग बी यांची फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील मोठी संपत्ती आहे. बिग बी त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.

पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे.
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका.
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला.
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा.
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन.
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी.
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी.
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?.
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.