दिग्दर्शकाने फसवणूक करून अभिनेत्रीचं केलं आक्षेपार्ह शूट; तिने कायद्याची मदत घेतली आणि…

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अभिनेत्रीने इंटिमेट सीन न करण्याचा घेतला होता निर्णय; पण 'त्या' एका आक्षेपार्ह शूटमुळे अभिनेत्री अडकली वादाच्या भोवऱ्यात

दिग्दर्शकाने फसवणूक करून अभिनेत्रीचं केलं आक्षेपार्ह शूट; तिने कायद्याची मदत घेतली आणि...
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 1:03 PM

मुंबई | 28 जुलै 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी मोठ्या पडद्यावर इंटिमेट सीन देण्यास नकार दिला. पण काही अभिनेत्रींना कल्पना नसताना अभिनेत्रींनी परवानगी नसताना देखील सीन शूट आणि मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आले. यामुळे काही अभिनेत्रींनी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी मात्र कायद्याची मदत घेतली. असंच काही झालं आहे अभिनेत्री आयेशा जुक्ला हिच्यासोबत. आयेशा आज बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आयेशा हिने अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘दलाल’ सिनेमामुळे देखील अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सिनेमाने देखील प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. पण तरी देखील आयेशा आनंदी नव्हती. सिनेमाच्या निर्मात्यांसोबत अभिनेत्रीची भांडणं देखील झाली. यासाठी अभिनेत्रीने कायद्याची देखील मदत घेतली.

निर्माते आणि दिग्दर्शकांनी आयेशा हिच्यासोबत फसवणूक केली होती. म्हणून अभिनेत्रीने कायद्याची मदत घेतली. सांगायचं झालं तर, सिनेमाचं नाव ऐकून आयेशाने सिनेमान भूमिका साकारण्यास नकार दिला होता. पण अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि सिनेमा निर्मात्यांच्या पत्नी यांनी समजावल्यामुळे आयेशा हिने सिनेमात काम करण्यास होकार दिला.

हे सुद्धा वाचा

पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अभिनेत्रीने इंटिमेट सीन न करण्याचा निर्णय घेतला होता. पण ‘त्या’ एका आक्षेपार्ह शूटमुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. पण शुटिंग दरम्यान, अभिनेत्रीला कोणतीही पूर्व कल्पना न देता निर्मात्यांनी बॉडी डबलच्या मदतीने एक रेप सीन शूट केला होता.

सीनमध्ये अभिनेत्रीला आपत्तीजनक अवस्थेत दाखवण्यात आलं होतं. सिनेमाच्या ट्रायल शोनंतर एका पत्रकाराने अभिनेत्रीला रेप सीनबद्दल माहिती दिली. तेव्हा आयेशा कळलं की, तिची फसवणूक झाली आहे. तेव्हा अभिनेत्रीचं निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत भांडण झालं आणि माफी मागण्याची मागणी केली.

पण अभिनेत्रीचं कोणीही ऐकलं नाही. अशात अभिनेत्रीने कायद्याची मदत घेतली. त्यानंतर निर्मात्यांनी लेखी स्वरुपात अभिनेत्रीची माफी मागावी लागली. आयेशा जुक्ला हिने अनेक सिनेमांमध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केली. पण अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत अभिनेत्रीच्या जोडीला चाहत्यानी डोक्यावर घेतलं.

अभिनेत्री आयशा जुल्का (ayesha jhulka) आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. अभिनेत्रीने खिलाडी कुमारसोबत ‘खिलाडी’, ‘बारूद’, ‘वक्त हमारा है’, ‘दिल की बाजी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. आयशा ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.