Sara Ali Khan हिचं गंभीर आजारामुळे सतत वाढत होतं वजन; फिटनेसबद्दल म्हणाली…
आता बोल्ड, हॉट दिसणारी सारा अली खान एकेकाळी होती वाढत्या वजनामुळे त्रस्त; गंभीर आजाराबद्दल अभिनेत्रीने म्हणाली...; सध्या सर्वत्र सारा हिच्या फिटनेसची चर्चा...
मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सारा अली खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सारा हिने फार कमी कालावधीत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सारा हिचे अनेक सिनेमे फ्लॉप देखील गेले, पण साराची लोकप्रियता कमी झाली नाही. सारा कायम चाहत्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत असते. शिवाय चाहत्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी देखील अभिनेत्री कायम उत्सुक असते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला सारा हिचा स्वभाव आवडतो. सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सारा हिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. म्हणून साराबद्दल काही खास गोष्टी आज तिच्या वाढदिवसा निमित्त जाणून घेवू…
आता बोल्ड, हॉट दिसणारी सारा अली खान एकेकाळी वाढत्या वजनामुळे त्रस्त होती. साराने खुद्द तिच्या आरोग्याबद्दल मोठी माहिती दिली होती. सोशल मीडियावर अभिनेत्रीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये साराने स्वतःचा फॅट-टू-फिट असा प्रवास दाखवला होता.. एवढंच नाही तर, एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या प्रकृतीबद्दल देखील मोठा खुलासा केला होता. पीसीओडीमुळे साराचं सतत वजन वाढत होतं.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अभिनेत्रीचं वजन ९६ किलो होतं. वजन कमी करण्यासाठी अभिनेत्रीने मोठी मेहनत घेतली. एकदा साराने तिच्या फिटनेस प्रवासाबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला होता. तिचं वजन ९० किलोपेक्षा जास्त वाढलं होतं. याचं कारण तिचं आजारपण होतं, परंतु जेव्हा तिने फिट होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अभिनेत्रीने कसलाही विचार केला नाही. आज सारा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
सारा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्री ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या माध्यमातून चाहच्यांच्या भेटीस आली. सिनेमात साराने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं..
सारा हिने ‘केदरनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. सिनेमात तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत होता. चाहते कायम साराच्या नव्या सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.
सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांच्यी संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कामय फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील साराच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.