Ekta Kapoor | वडिलांच्या एका अटीमुळे एकता कपूर आजही अविवाहित; हैराण करणारं सत्य समोर

एकता कपूर हिच्या लग्नाचं अभिनेता सलमान खानसोबत खास कनेक्शन! वडिलांच्या एका अटीमुळे कोट्यवधींची मालकीण आजही अविवाहित

Ekta Kapoor | वडिलांच्या एका अटीमुळे एकता कपूर आजही अविवाहित; हैराण करणारं सत्य समोर
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 2:19 PM

मुंबई | छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपली ओळख निर्माण करणारी एकता कपूर (Ekta Kapoor) कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. एकताने पडद्यावर न राहता, पडद्यामागे मोलाची भूमिका पार पाडत इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. सध्या सर्वत्र एकता कपूर आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा करत आहे. टीव्ही क्विन म्हणून देखील अभिनेत्रीची ओळख आहे. एकताच्या प्रत्येक मालिकेला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. पण खासगी आयुष्यात मात्र एकता आजही एकटी आहे. ‘सिंगल मदर’ म्हणून एकता मुलाचा सांभाळ करत आहे. अशात एकताला कायम लग्नाबद्दल विचारण्यात येत. यावर एकताने अनेकदा खुलासा केला आहे. पण एका मुलाखतीत एकताने वडील जीतेंद्र (Jeetendra) यांना जबाबदार ठरवलं आहे.

बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडच्या क्रिएटिव्ह हेड आणि व्यवस्थापकीय संचालक एकता कपूर यशाच्या उच्च शिखरावर विराजमान आहे. एका मुलाखीतत एकताला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला. प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा सलमान खान लग्न करेल, तेव्हा मी देखील लग्न करेल…’ एवढंच नाही तर, एका मुलाखतीत एकतान लग्न झालं नाही यासाठी स्वतःच्या वडिलांना जबाबदार ठरवलं होतं.

मुलाखतीत एकताने वडिलांच्या एका अटीबद्दल सांगितलं होतं. एकता म्हणाली, ‘तुला लग्न करावं लागेल, किंवा कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल…’ वडिलांच्या अटीनंतर एकताने करियरला अधिक महत्त्व दिलं. एकता आजही योग्य जोडीदाराच्या प्रतीक्षेत आहे. योग्य जोडीदार भेटल्यानंतर लग्न करेल असं देखील एकता अनेक मुलाखतीत म्हटली आहे.

हे सुद्धा वाचा

करण जोहर आणि एकता कपूर

दिग्दर्शक करण जोहर याने एका मुलाखतीत आपण एकताशी लग्न करायसाठी तयार असल्याचं सांगितलं होतं,‘जर मला आणि एकताला योग्य जोडीदार मिळाला नाही, तर मी एकतासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे’, असं करण म्हटला होता. शिवाय ‘आमच्या लग्नामुळे माझी आई प्रचंड आनंदी होईल. कारण तिला मालिकांमध्ये पुढे काय होणार, हे आधीच माहिती असेल’. करणची ही मुलाखत प्रचंड व्हायरल झाली होती.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.