Johny Lever यांच्या आयुष्यातील वाईट काळ, दिवसाला मिळायचे ५ रुपये, स्वतःला संपवण्याचा विचार केला पण…
जॉनी लिव्हर यांच्या आयुष्यातील वाईट दिवस... कुटुंबाची भूक भागवण्यासाठी करायचे 'असं' काम, नशिबाने साथ दिली आणि विनोदी अभिनेता म्हणून मिळाली प्रसिद्धी...
मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर (Johny Lever) आज कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगत आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा जॉनी लिव्हर यांना कुटुंबाची भूक भागवण्यासाठी अनेक वाईट परिस्थितीचा समना करावा लागला. पण जॉनी लिव्हर यांनी वाईट परिस्थितीवर मात करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं राज्य स्थापन केलं. मुंबईतील चाळीत गरिबीत वाढलेल्या जॉनी यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. असं असूनही ते सर्वांना हसवत राहिले. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या त्या खास गोष्टी ज्या फार कमी चाहत्यांना माहिती असतील.
जॉनी लिव्हर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ साली झाली होता. लहानपणी जॉनी लिव्हर चाळीत रहायचे. पण एक वेळ अशी आली की, अभिनेत्याच्या कुटुंबाला मुंबईच्या झोपडपट्टीत स्थलांतरित व्हावे लागलं. आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त असलेल्या जॉनी लिव्हर शाळेतून घरी आल्यानंतर वाढदिवसांच्या पार्टीमध्ये काम करायचे. एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्याने आयुष्याबद्दल सांगितलं आहे.
मुलाखतीत जॉनी लिव्हर म्हणाले, ‘माझे वडील व्यसनी होते. ज्यामुळे त्यांचं लक्ष कधीच कुटुंबावर नव्हतं. काका माझ्या शाळेची फी आणि घरातील सामान भरायचे.’ अखेर परिस्थितीला कंटाळून जॉनी यांनी शाळा सोडली. जॉनी लिव्हर यांनी फक्त सातवी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी जॉनी यांनी रस्त्यावर पेन विकण्याचं काम सुरु केलं.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, एकवेळ अशी आली जेव्हा जॉनी लिव्हर यांनी स्वतःसंपवण्यचा देखील विचार केला होता. वयाच्या १३ व्या वर्षी जॉनी लिव्हर यांनी टोकाचा निर्णय घेतला होता. स्वतःला संपवण्यासाठी जॉनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपले आणि ट्रेन येण्याची वाट पाहू लागले पण नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच काही ठरवलं होतं.
जॉनी लीव्हरची पेन विकण्याची शैली अगदी अनोखी होती. त्यामुळेच ते बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करू शकले. ते कॉमेडी करून किंवा स्टार्सची नक्कल करून पेन विकायचे. या कामातून दिवसाला फक्त त्यांना पाच रुपये मिळायचे. दिवसा पेन विकल्यानंतर हिंदुस्थान लीव्हर कंपनीत नोकरीसाठी जायचे. म्हणून त्यांचं लिव्हर असं नाव पडलं…
जॉनी लीव्हरच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी १९८४ मध्ये सुजाता यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. दोन्ही मुलं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.