वयाच्या 15 व्या वर्षी वडिलांचं घर सोडलं, शारीरिक छळ, ‘ही’ महिला आज 4 राष्ट्रीय पुरस्कारांची विजेती

Actress Life | स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने वयाच्या 15 व्या वर्षी वडिलांचं घर सोडलं, रस्त्यावर झोपली, शारीरिक छळची शिकार... ‘ही’ महिला आज 4 राष्ट्रीय पुरस्कारांची विजेती... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा... कोण आहे ती? जाणून बसेल धक्का...

वयाच्या 15 व्या वर्षी वडिलांचं घर सोडलं, शारीरिक छळ, ‘ही’ महिला आज 4 राष्ट्रीय पुरस्कारांची विजेती
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 2:36 PM

स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकदा आऊट ऑफ द बॉक्स जाऊन निर्णय घ्यावे लागतात आणि स्वप्न पूर्ण झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसणारा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही… असचं ताही झाली आहे अभिनेत्री कंगना रनौत हिच्यासोबत. आज कंगना हिचा वाढदिवस आहे. अभिनेत्रीने अनेक संकटांवर मात करत यशाचं उच्च शिखर गाठलं आहे. कंगनाच्या करियरची सुरुवात वयाच्या 15 व्या वर्षी झाली. वयाच्या 15 व्या वर्षी कंगना हिने वडिलांचं घर सोडलं आणि मुंबईत आली. खुद्द कंगना हिने तिच्या प्रवासाबद्दल मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलं आहे.

रिपोर्टनुसार, कंगना मुंबईत आली तेव्हा तिच्याकडे काहीही नव्हतं. स्वतःचं घर नसल्यामुळे अभिनेत्री रस्त्यावर झोपली. अभिनेत्रीला शारीरिक छळाचा सामना करावा लागला. अनेकांनी अभिनेत्रीची फसवणूक केली. पण तिच्या मदतीला कधीच कोणी आलं नाही. अनेक कठीण प्रसंगाचा सामना केल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.

खुद्द कंगना हिने तिच्या वाईट दिवसांबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘माझा प्रवास फार कठीण होता. मुंबईत आली तेव्हा मी रॉयल आयुष्य जगत नव्हती. मी बस, टॅक्सी, ट्रेनमधून प्रवास केला आहे. पायी चालली आहे. माझ्याकडे घर नव्हतं म्हणून मी रस्त्यावर झोपली आहे. अनेकांच्या जाळ्यात मी अडकली होती, म्हणून पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली. वयाच्या 17 व्या वर्षी वडिलांच्या वयाच्या व्यक्तीने माझं शोषण केलं. व्यक्ती बॉलिवूडमधील होता. मी त्याच्या जाळ्यात अडकली आहे मला कळलं होतं. तुम्हाला वाटतं लोकं तुमच्या मदतीसाठी येत असतात. पण फुकट जेवायला कोणी देत नाही.’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘वडिलांच्या वयाच्या व्यक्तीने माझ्या डोक्यावर वार केला. मी रक्त बंबाळ अवस्थेत होती. त्या व्यक्ती विरोधात मी तक्रार दाखल केली. पण काहीही झालं नाही. त्याला समज दिली आणि त्याची सुटका झाली…’ आज कंगनाला कोणत्या ओळखीची गरज नाही. कंगना एका सिनेमासाठी 15 ते 27 कोटी रुपये मानधन घेते. सोशल मीडियावर देखील कंगना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

कंगना स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. अभिनेत्रीने एक दोन नाही चार राष्ट्रीय पुरस्कारांवर स्वतःचं नाव कोरलं आहे. कंगना आज गडगंज संपत्तीची मालकीण आहे. कुटुंबासोबत कंगना रॉयल आयुष्य जगत आहे.

कंगना रनौत हिच्या लग्नाच्या चर्चा…

गेल्या काही दिवसांपासून कंगना हिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. कुटुंबाने अभिनेत्रीच्या लग्नाची तयारी देखील केली असल्याची माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, कंगना हिने स्वतःच्या लग्नासाठी लेहेंगा तयार करण्यासाठी दिला आहे. कंगना अशा एका डिझायनरकडून लेहेंगा तयार करुन घेणार आहे, जो बॉलिवूड विश्वातील तर आहे, पण प्रसिद्ध नाही… कंगना ही गोष्टी फार गुपित ठेवली आहे. त्यामुळे कंगना कधी लग्नाची घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.