सिनेमांमध्ये काम नाही, पतीची साथ नाही, तरीही करिश्मा कपूर कमवते कोट्यवधींची माया

Karisma Kapoor Net Worth : कोणत्या मार्गांनी करिश्मा कपूर कमावते कोट्यवधींची माया, अभिनेत्री जगतेय रॉयल आयुष्य, संपत्तीचा आकडा थक्क करणारा..., सध्या सर्वत्र करिश्मा कपूर हिच्या खासगी आणि संपत्तीची चर्चा... संपत्तीचा आकडा थक्क करणारा...

सिनेमांमध्ये काम नाही, पतीची साथ नाही, तरीही करिश्मा कपूर कमवते कोट्यवधींची माया
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 3:00 PM

अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. कपूर कुटुंबातील करिश्मा ही पहिली मुलगी आहे, जिने बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला. करिश्मा हिने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन स्वप्न पूर्ण केली. करिश्मा हिच्या आई यांनी देखील कायम लेकीला प्रोत्साहन दिलं. शिक्षण सोडून करिश्माने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी ‘प्रेम कैदी’मधून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली.

पहिला सिनेमा ‘प्रेम कैदी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर करिश्माने एकापाठोपाठ एक 5 फ्लॉप सिनेमे दिले. पण अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. महत्त्वाचं म्हणजे अभिनेता सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत देखील अभिनेत्रीची जोडी फेल ठरली. पण 1992 साली प्रदर्शित झालेल्या ‘जिगर’ सिनेमातून चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये करिश्मा हिचा बोलबाला होता. आज करिश्मा बॉलिवूड पासून दूर आहे. तरी देखील कोट्यवधींचा माया कमावते. करिश्मा सिनेमांपासून दूर असली तरी तिच्याकडे संपत्तीची कमतरता नाही. करिश्मा आज रॉयल आयुष्य जगत आहे.

हे सुद्धा वाचा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूरची संपत्ती 12 मिलियन डॉलर म्हणजेच 87 कोटी रुपये इतकी आहे. जाहिरात आणि मॉडेलिंगच्या माध्यमातून अभिनेत्री कोट्यवधींची कमाई करते. अभिनेत्री Babyoye कंपनीची शेअरहोल्डर आहे. शिवाय अनेक शोमध्ये अभिनेत्री परीक्षकाची भूमिका देखील बजावते.

करिश्मा कपूर हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘अनाडी’ सिनेमातून देखील अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. करिश्मा कपूर हिने जवळपास 50 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं. ‘राजा बाबू’, ‘आशिक’, ‘फिजा’, ‘हम साथ साथ हैं’, ‘हसीना मान जाएगी’, ‘दिल तो पागल है’, ‘हीरो नंबर 1’, ‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘जीत’ यांसारखे सुपरहीट सिनेमे करिश्माने बॉलिवूडला दिले.

करिश्मा कपूर प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं पण अभिनेत्रीला खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. उद्योजक संजय कपूर यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे. अभिनेत्री अनेक ठिकाणी मुलांसोबत स्पॉट देखील करण्यात येतं.

सोशल मीडियावर देखील करिश्मा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.