भाड्याच्या घरात राहणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीकडे आज आहे गडगंज संपत्ती; ‘या’ माध्यमातून कमावते कोट्यवधींची माया

झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान भक्कम करताना आल्या असंख्य अडचणी; पण सर्व गोष्टींवर मात करत 'ही' अभिनेत्री आज कमावते कोट्यवधी रुपयांची माया, कोण आहे 'ती'?

भाड्याच्या घरात राहणाऱ्या 'या' अभिनेत्रीकडे आज आहे गडगंज संपत्ती; 'या' माध्यमातून कमावते कोट्यवधींची माया
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 2:52 PM

मुंबई : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर छोट्या आणि मोठ्या पडद्यावर स्वतःचं वेगळं वर्चस्व निर्माण केलं. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर देखील काही अभिनेत्रींच्या चाहत्यांची संख्या  फार मोठी आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मंदिरा बेदी. मंदिरा बेदी हिने अनेक गोष्टींचा सामना करत झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख तयार केली. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये झळकलेली मंदिरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. वयाच्या ५१ व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते.

ग्लॅमरस आणि बोल्ड तर मंदिरा आहेच, पण अभिनेत्री तितकीच फिटनेस फ्रिक देखील आहे. ती कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय स्वतःचे वर्कआऊट करताना व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना फिट राहण्याचं आवाहन करत असते. सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रॉयल आयुष्य जगते. शिवाय अनेक माध्यमातून कोट्यवधींची माया देखील कमावते.

मंदिरा अनेक वर्षांपासून झगमगत्या विश्वात सक्रिय आहे. अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिने स्वतःची ओळख तयार केली आहे. आधी भाड्याच्या घरात राहणारी मंदिरा आज कोट्यवधी रुपयांची मालक आहे. अभिनेत्रीच्या बंगल्याचं नाव ‘रामा’ आहे. या बंगल्याची विशेष गोष्ट म्हणजे, अभिनेत्रीच्या पतीचं नाव राज मधील ‘रा’ आणि मंदिरा नावातील ‘मा’ एकत्र करत बंगल्याचं नाव ‘रामा’ ठेवण्यात आलं आहे..

हे सुद्धा वाचा

मंदिराचं कार कलेक्शन देखील फार मोठं आहे. अभिनेत्रीकडे टाटा नेक्सन ईव्ही आणि मर्सिडीज बेंज यांसारख्या महागड्या कार आहेत. झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान भक्कम करताना आल्या असंख्य अडचणींचा सामना केल्यानंतर अभिनेत्री आज कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगत आहे. सध्या सर्वत्र मंदिरा आणि तिच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे.

मंदिरा संपत्ती कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. अभिनेत्रीची संपत्ती २.३ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास १८ कोटी रुपये आहे. सिनेमे आणि मालिकांमधून अभिनेत्री बक्कळ कमाई करते. अभिनेत्री एका सिनेमासाठी ५० लाख रुपये मानधन घेते. एवढंच नाही तर, मंदिरा प्रसिद्ध फॅशन डिझायनर देखील आहे. ती स्वतः साडी डिझाईन करते. अभिनेत्रीने डिझाइन केलेल्या साड्या ई-कॉमर्स वेबसाइट्स विक्रीसाठी उपलब्ध असतात. याशिवाय गार्मिन इंडियाने मंदिरा बेदी हिला फिटनेस कोच आणि ब्रँड अॅम्बेसेडर देखील बनवलं आहे, ज्यासाठी अभिनेत्री सुमारे  २ ते ४ कोटी रुपये घेते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी कोट्यवधी रुपयांचा कमाई करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांच्या यादीमध्ये मंदिरा देखील पुढे आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे जवळपास १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर दुसरीकडे जाहिरातींच्या माध्यमातून देखील अभिनेत्री कोट्यवधींची कमाई करते. महत्त्वाचं म्हणजे, अभिनेत्रीची नेटवर्थ प्रत्येक वर्षी २० टक्क्यांनी वाढत आहे.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.