मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे 80 – 90 नाहीतर, आहेत इतके कुत्रे, महागड्या गाड्या, आलिशान घर आणि बरंच काही

Mithun Chakraborty | 100 कोटींपेक्षा महागडे कुत्रे, आलिशान - भव्य हॉटेलचा व्यवसाय, 3 कोटींच्या कारमधून प्रवास, 51 सुपरहीट सिनेमे देणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांची नेटवर्थ भुवया उंचावणारी, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मिथुन दा यांच्या रॉयल आयुष्याची चर्चा...

मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे 80 - 90 नाहीतर, आहेत इतके कुत्रे, महागड्या गाड्या, आलिशान घर आणि बरंच काही
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 1:13 PM

बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. मिथुन दा यांनी 1976 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर कधीच मागेवळून पाहिलं नाही. मिथुन दा यांनी फक्त हिंदी नाहीतर, बांग्ला, ओडिश, भोजपुरी, तेलुगू, कन्नड, पंजाबी सिनेविश्वात देखील काम केलं आहे. मिथुन दा यांनी त्यांच्या करियरमध्ये जवळपास 350 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला. मिथुन दा यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांची चर्चा रंगली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेले मिथुन दा कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगत आहे. मिथुन दा यांच्याकडे आलिशान घर, हॉटेव व्यवसाय आहे. मिथुन दा यांच्या संपत्तीचा आकडा माहिती पडल्यानंतर तुमच्या देखील भुवया उंचावतील… रिपोर्टनुसार मिथुन दा यांची नेटवर्थ 400 कोटी रुपये आहे.

मिथुन दा यांच्याकडे दोन बंगले आहेत. त्यांचा एक बंगला मड आयलँड आणि दुसरा बंगला वांद्रे याठिकाणी आहे. मिथुन दा यांच्या बंगल्याची किंमत जवळपास कोट्यवधी रुपये आहे. मिथुन दा यांचा मड आयलँड येथील बंगला 1.2 एकर क्षेत्रात पसरलेला आहे. शिवाय मिथुन दा यांच्याकडे मुंबई, ऊटी आणि कोलकाता याठिकाणी देखील आलिशान घर आहे.

हे सुद्धा वाचा

मिथुन दा यांच्याकडे आहेत 116 कुत्रे

मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन दा याच्या मड आयलँड याठिकाणी असलेल्या बंगल्याची किंमत 45 कोटी आहे. मिथुन दा यांच्याकडे 116 कुत्रे आहेत. मुंबई येथील मड आयलँड येथे असलेल्या बंगल्यात 76 कुत्रे आहेत. तर ऊटी याठिकाणी असलेल्या बंगल्यात 38 कुत्रे आहेत. बंगल्यात कुत्र्यासाठी खास घर देखील बांधण्यात आलं आहे. ज्यामध्ये अनेक सुविधा देखील आहेत.

मिथुन चक्रवर्ती यांचं कार कलेक्शन

मिथुन चक्रवर्ती यांनाही कार आवडतात. त्यांच्या गॅरेजमध्ये कोट्यवधी रुपयांच्या लक्झरी कार आहेत. ज्यात फोर्ड एंडेव्हर, फोक्सवॅगन आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

मिथुन चक्रवर्ती यांचे हॉटेल

मिथुन चक्रवर्ती हे मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्सचे मालक आहेत, जे ऊटीमधील सर्वात प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक आहे. मिथुन केवळ सिनेमे आणि ब्रँड प्रमोशनमधूनच नव्हे तर त्यांच्या हॉटेल व्यवसायातूनही बंपर कमाई करतात. मिथुन चक्रवर्ती यांचे तामिळनाडूतील मसीनागुडी येथे 16 बंगले आणि कॉटेज आहेत. मिथुन दा यांचे म्हैसूरमध्ये 18 कॉटेज आणि अनेक रेस्टॉरंट आहेत. त्याच्याकडे एक फार्महाऊस देखील आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.