Love Life | आईला पसंत नव्हता अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड; तिने सर्वकाही पणाला लावलं पण…
Love Life | अभिनेत्रीच्या आईला मान्य नव्हते अनोळख्या मुलासोबत लेकीचे प्रेमसंबंध; अभिनेत्री घेतला मोठा निर्णय पण गंभीर आजाराला खिळल्यानंतर... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा... बॉलिवूडपासून दूर अभिनेत्री आता करते तरी काय?

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : प्रेम, ब्रेकअप, वाद, भांडणं, तिरस्कार यांसारख्या अनेक झगमगत्या विश्वातील गोष्टी चाहत्यांच्या समोर येत असतात. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचं ब्रेकअप झालं आहे. पण काही सेलिब्रिटींची ब्रेकअप त्यांच्या आईमुळे झालं. आता देखील अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, जिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चाहत्यांनी अभिनेत्रीला डोक्यावर देखील घेतलं. पण रिलेशनशिप आणि त्यानंतर गंभीर आजाराने त्रस्त अभिनेत्री आता कुठे आहे काय करते कोणालच माहिती नव्हतं. पण आता अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं सत्य समोर येत आहे. सध्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) आहे.
एका मुलाखतीत अभिनेत्री तिच्या रिलेशनशिपबद्दल म्हणाली होती. नर्गिस एका मुलाच्या प्रेमात होती. ६ महिने अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये होती. पण अभिनेत्रीच्या आईला लेकीचं नातं मान्य नव्हतं. अशात अभिनेत्रीने आई – वडिलांचं घर सोडलं आणि स्वतःचा मोर्चा मुंबईच्या दिशेने वळवला. अभिनेत्रीने तिच्या करियरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली.
मॉडेलिंग करत असताना, नर्गिस हिला अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत ‘रॉकस्टार’ सिनेमात स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली. ‘रॉकस्टार’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. नर्गिस जितकी सुंदर आहे, तितकीच प्रतिभावान देखील आहे.




अभिनेत्रीला तिचा पहिला सिनेमा ‘रॉकस्टार’साठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते. ‘रॉकस्टार’ सिनेमानंतर अभिनेत्रीने ‘मद्रास कैफे’, ‘मैं तेरा हीरो’ आणि ‘हाउसफुल 3’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
नर्गिस हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, एक वेळ अशी होती जेव्हा नर्गिस आणि उदय चोप्रा यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज दोघे त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत.
गंभीर आजारामुळे त्रस्त होती अभिनेत्री
ब्रेकअपनंतर नर्गिस न्यूयॉर्कला गेली. ब्रेकअपमुळे अभिनेत्रीने देश सोडल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र, रंगणाऱ्या चर्चावर अभिनेत्री मुलाखतीच्या माध्यमातून पूर्ण विराम दिला. नर्गिस एका गंभीर आजारामुळे त्रस्त होती म्हणून उपचारासाठी अभिनेत्री परदेशात गेली होती. आता अभिनेत्री भारतात परतली आहे. रुपेरी पडद्यानंतर अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करणार आहे.