श्रेयस तळपदेची Untold स्टोरी, सर्वांपासून लपवलं लग्न, कॉलेज सेक्रटरीसोबत अभिनेत्याची हटके लव्हस्टोरी

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेचं कॉलेज सेक्रटरीवर जडला जीव, 'या' कारणामुळे सर्वांपासून लपवलं लग्न... तुम्हाला माहितेय अभिनेत्याची Untold स्टोरी... सर्वत्र फक्त आणि फक्त श्रेयस याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

श्रेयस तळपदेची Untold स्टोरी, सर्वांपासून लपवलं लग्न, कॉलेज सेक्रटरीसोबत अभिनेत्याची हटके लव्हस्टोरी
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 12:05 PM

मुंबई | 27 जानेवारी 2024 : अभिनेता श्रेयस तळपदे याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयस याची प्रकृती गंभीर होती. पण आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. प्राण बचावल्यानंतर माझा हा दुसरा जन्म आहे… असं खुद्द श्रेयस म्हणाला होता. आज श्रेयस याचा वाढदिवस असल्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला आहे. सांगायचं झालं तर, श्रेयस कायम त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण अभिनेत्याने कधीच स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल वक्तव्य केलं नाही. पण श्रेयस याची लव्हस्टोरी फार भन्नाट आहे.

श्रेयस आणि दिप्ती यांची पहिली भेट दिप्ती हिच्या कॉलेजमध्ये झाली होती. तेव्हा कॅलेजच्या सेक्रेटरीला म्हणजे दिप्तीला पाहून, पहिल्या नजरेतच श्रेयस दिप्तीच्या प्रेमात पडला. ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण श्रेयस याला दिप्तीसोबत झालेलं लग्न लपवावं लागलं.

श्रेयस याचा ‘इकबाल’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार होता. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या सहा महिन्यांपूर्वी श्रेयस याने दिप्ती हिच्यासोबत लग्न केलं. पण श्रेयस याला लग्न सर्वांपासून लपवावं लागलं. श्रेयस याने लग्न केलं म्हणून सिनेमाचे दिग्दर्शक नागेश कुकुनूर नाराज होते.

हे सुद्धा वाचा

श्रेयस याचं लग्न झालं आहे.. ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचली, तर त्याचा परिणाम सिनेमावर होईल याची भीती दिग्दर्शकांना होती. म्हणून नागेश यांनी अभिनेत्याला लग्न रद्द कर म्हणून सांगितलं. पण मध्यम वर्गीय घरातील लग्न होतं. लग्नाच्या पत्रिका वाटून झाल्या होत्या. म्हणून लग्न रद्द करणं शक्य नव्हतं. एवढंच नाही तर, लग्नासाठी श्रेयस याला सुट्ट्या देखील मिळणार नव्हत्या.

अशात दिग्दर्शकांनी विचार केला की, श्रेयस सिनेमात डेब्यू करत आहे आणि अशात लग्न केल्यास सिनेमावर आणि श्रेयसच्या करियरवर वाईट परिणाम होतील. पण श्रेयसने दिग्दर्शकांना सांगितलं की, मी लग्नाबद्दल कोणालाही सांगणार नाही. तेव्हा लग्नासाठी अभिनेत्याला एका दिवसाची सुट्टी मिळाली आणि श्रेयस आणि दिप्तीचं लग्न झालं.

श्रेयसने लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले. लग्नाच्या 14 वर्षांनंतर 4 मे 2018 साली श्रेयस आणि दिप्ती सरोगेसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. श्रेयस कायम पत्नी आणि लेकीसोबत फोटो पोस्ट करत असते. श्रेयस सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.