स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘अंगूरी भाभी’ने अवघ्या ११ महिन्यांच्या मुलीला सोडलं आणि…

लग्नानंतर अभिनय क्षेत्रात ठेवलं पाऊल, करियर भक्कम करण्यासाठी अंगूरी भाभीने ११ महिन्यांच्या मुलीला सोडलं आणि..., आज अभिनेत्री करते असंख्य चाहत्यांच्या मनावर राज्य

स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'अंगूरी भाभी'ने अवघ्या ११ महिन्यांच्या मुलीला सोडलं आणि...
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 11:00 AM

मुंबई : स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील असंच काही झालं आहे, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘भाभी जी घर पर हैं’ मालिकेत ‘अंगूरी भाभी’ ही भूमिका साकरणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) आहे. शुभांगी आज टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने मेहनतीने आणि कष्टाने टीव्ही विश्वात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. पण खासगी आयुष्य ते छोट्या पडद्यापर्यंतचा शुभांगीचा प्रवास फार कठीण होता. शुभांगीने लग्नानंतर अभिनय विश्वात पाय ठेवला. यासाठी तिने अवघ्या ११ महिन्यांच्या मुलीला सोडण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईमध्ये स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली.

शुभांगीने २००३ मध्ये उद्योजक पियूष पुरी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्री पतीसोबत पुण्यात राहत होती. लग्नानंतर अभिनेत्रीने एका गोडंस मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव आशी असं आहे. आई झाल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. (Shubhangi Atre Career)

हे सुद्धा वाचा

अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शुभांगी पती आणि ११ महिन्यांच्या मुलीला सोडून मुंबई येथे आली. पण काही दिवसांनंतर शुभांगीचे पती आणि मुलगी देखील पुणे सोडून मुंबई येथे राहण्यासाठी आले. शुभांगीने मॉडलिंगपासून करियरची सुरुवात केली. त्यानंतर शुभांगीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

मॉडलिंगनंतर तिने मालिकांसाठी ऑडिशन दिल्या. शुभांगीने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. शुभांगीने, ‘कसौटी जिंदगी की’, ‘हवन’, ‘दो हंसो का जोडा’, ‘कस्तूरी’, ‘चिडियाघर’ या मालिकांमध्ये काम केलं. पण ‘भाभी जी घर पर हैं’ मालिकेतून शुभांगीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

मालिकेत ‘अंगूरी भाभी’ ही भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात घर केलं. आजही शुभांगी कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शुभांगीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शुभांगीने मालिकेला राम राम ठोकल्यानंतर मालिकेत अंगूरी भाभीच्या भूमिकेत अभिनेत्री शिल्पा शिंदे झळकली.

अभिनेत्री शुभांगी अत्रे सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. अभिनेत्रीने आज स्वतःच्या बळावर झगमगत्या विश्वात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.