प्रसिद्ध फिल्ममेकरच्या पत्नीने Urmila Matondkar यांच्या लगावली कानशिलात; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क
उर्मिला मातोंडकर यांनी प्रसिद्ध फिल्ममेकरसोबत असं काय केलं, ज्यामुळे फिल्ममेकरच्या पत्नीने अभिनेत्रीच्या लगावली कानशिलात; त्यामागचं कारण समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ
Happy Birthday Urmila Matondkar : एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांच्या नावाची चर्चा होती. १९९० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून उर्मिला मातोंडकर यांचं नाव अव्वल स्थानी होतं. अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत उर्मिला मातोंडकर यांनी चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. एवढंच नाही तर, उर्मिला मातोंडकर यांची ओळख ‘रंगीला गर्ल’ म्हणून तयार झाली. आज उर्मिला मातोंडकर त्यांचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेवू.
एक काळ असा होता जेव्हा उर्मिला मातोंडकर यांच्या सौंदर्याची जादू प्रत्येकाच्या मनावर होती. बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर… त्यांच्या सौंदर्याची जादू दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्यावर देखील चढली होती. उर्मिला मातोंडकर आणि रामगोपाल वर्मा यांच्या नावाच्या चर्चा इंडस्ट्रीमध्ये तुफान रंगल्या.
‘द्रोही’ सिनेमाच्या एका गाण्याच्या शुटिंग दरम्यान, रामगोपाल वर्मा यांना उर्मिला यांचा डान्स प्रचंड आवडला. त्यानंतर रामगोपाल वर्मा यांनी ‘रंगीला’ सिनेमासाठी उर्मिला यांची निवड केली. ‘रंगीला’ हीट झाल्यानंतर रामगोपाल यांच्या प्रत्येक सिनेमात उर्मिला असायच्या. त्यानंतर दोघांच्या नात्याने आणखी जोर धरला. आजही त्यांच्या नात्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.
दरम्यान, जेव्हा एका सिनेमातून अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला बाहेरचा रस्ता दाखवत सिनेमात उर्मिला यांना घेतलं, तेव्हा उर्मिला आणि रामगोपाल वर्मा यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. जेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा रामगोपाल वर्मा यांच्या पत्नीपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांनी उर्मिला यांच्या कानशिलात लगावली असं सांगण्यात येतं. या प्रकरणानंतर रामगोपाल वर्मा यांनी पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि उर्मिला यांच्यातसोबत असलेलं नातं देखील संपवलं.
रिपोर्टनुसार, रामगोपाल वर्मा यांच्यासोबत काम करण्यासाठी उर्मिला यांनी अनेक दिग्दर्शकांना नकार दिला. ज्याचा परिणाम रामगोपाल वर्मा यांच्यासोबत असलेलं नातं संपल्यानंतर अभिनेत्रीला दिसून आला. त्यानंतर उर्मिला यांना सिनेमांसाठी ऑफर येणं बंद झालं. अखेर त्यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला आणि त्यांनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला.
आज उर्मिला मातोंडकर बॉलिवूडपासून दूर असल्यातरी त्याच्या अभिनयाची आणि डान्सची चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. आज देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उर्मिला मातोंडकर सोशल मीडियाची मदत घेतात. त्यांची प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होते.