मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि अभिनेता अर्जुन कपूर आज बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्यांपैकी एक आहेत. दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. वरुण आणि अर्जुन कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. एवढंच नाही तर, वरुण आणि अर्जुन यांच्या मैत्रीचे किस्से देखील चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वरुण आणि अर्जुन एकमेकांचं खास मित्र आहेत. शिवाय दोघांचं शिक्षण देखील एकत्र झालं आहे. दोघे कायम अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. सध्या वरुण आणि अर्जुन यांच्या आयुष्यातील एका खास मुलीची चर्चा तुफान रंगत आहे. त्या मुलीबद्दल सांगताना वरुण आणि अर्जुन म्हणाले, ‘तिने आम्हाला दोघांना फिरवलं..’ सध्या सर्वत्र वरुण आणि अर्जुन यांची चर्चा रंगत आहे. (Happy Birthday Varun dhawan)
दिग्दर्शक साजिद खान आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या ‘यारो की बारात’ शोमध्ये वरुण आणि अर्जुन यांनी एकत्र हजेरी लावली होती. शोमध्ये वरूण आणि अर्जुन यांनी त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. वरुण म्हणाला त्यांच्या ऍक्टिंग स्कूलमध्ये एक मुलगी होती. वरुण आणि अर्जुन दोघांचा त्या मुलीवर जीव जडला होता.
[UNSEEN PICS] Behind the scenes from today’s masti-filled episode of #YaaronKiBaraat with @arjunk26 & @Varun_dvn @ZeeTV @SimplySajidK pic.twitter.com/nEZ6OkLd2X
— Arjun Kapoor FC USA (@arjunkusafc) October 22, 2016
वरुण म्हणाला, ‘मला कल्पना देखील नव्हती माझी मैत्रीण अर्जुन याच्यासोबत आहे. अर्जुन वर्गात शांत असायचा आणि तो फक्त माझ्यासोबत बोलायचा. एका कार्यक्रमात त्या मुलीने मला तिच्या आणि अर्जुनबद्दल सांगितलं.’ त्यानंतर वरुणला वाटलं अर्जुन चांगला मित्र असून देखील माझ्यापासून सर्व काही लपवून ठेवलं… पण तिने आम्हाला दोघांना फिरवलं असं देखील वरुण म्हणाला.
पुढे अर्जुन म्हणाला, ‘क्लासमध्ये वरुण असा मुलगा होता, जो मुलीला पाहताच फ्लर्ट सुरु करायचा.’ शोमध्ये वरूण आणि अर्जुन विचारलं की, दोघांपैकी सर्वात जास्त फ्लर्ट कोण करतं… यावर वरुण याने अर्जुनकडे इशारा केला आणि अर्जुनने होकार दिला. सध्या सर्वत्र वरूण आणि अर्जुन यांच्या मैत्रीची चर्चा रंगत आहे.
अर्जुन कपूर कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मलायका आणि अर्जुन एकत्र दिसतात. अर्जुन देखील मलायकावर असलेलं प्रेम व्यक्त करत अभिनेत्रीसोबत फोटो पोस्ट करत असतो. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या.
महत्त्वाचं म्हणजे अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली आहे. एवढंच नाही अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मलायका – अर्जुन त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात शिवाय, चाहत्यांना कपल गोल्स देखील देत असतात.