ऐश्वर्या रायसोबत अफेअर, लग्नापर्यंत नाही पोहोचलं नातं, अखेर अभिनेत्याने राजकारणी कुटुंबासोबत जोडलं नातं
Aishwarya Rai Ex-Boyfriend: ऐश्वर्या रायसोबत प्रेमाचा वाईट अंत, लग्नाचं स्वप्न भंगल्यानंतर, अभिनेत्याने माजी विधानसभा सदस्याच्या मुलीसोबत थाटला संसार... आता जगतोय असं आयुष्य, अभिनेता कायम खासगी आयुष्यामुळे असतो चर्चेत...

अभिनेत्री ऐश्वर्या राय आज तिच्या आयुष्यात फार पुढे निघून गेली आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा ऐश्वर्या हिच्या नावाची चर्चा काही अभिनेत्यांसोबत झाली. ऐशर्या आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल प्रत्येका माहिती आहे. दोघांच्या नात्याचा अंत देखील फार वाईट होता. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात अभिनेता विवेक ओबेरॉय याची एन्ट्री झाली. जेव्हा विवेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल सलमान याला कळलं तेव्हा अनेक वाद देखील झाले होते. आज विवेक याचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांची ‘लव्हस्टोरी’
सलमान – ऐश्वर्या यांच्या लव्हस्टोरीच्या चर्चा आजही रंगत असतात. पण दोघांच्या नात्याचा अंत 2002 मध्येच झाला. ब्रेकअपचं कारण होतं सलमान खान याचा स्वभाव… ब्रेकअपनंतर ऐश्वर्या सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त झाली. दरम्यान, ‘क्यों हो गया ना’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना विवेक आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम बहरलं. विवेक – ऐश्वर्या यांनी काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर सलमान पर्यंत दोघांच्या नात्याचं सत्य पोहोचलं.
अशात सलमान खान याने विवेक याला धमकावायला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2003 मध्ये विवेकने पत्रकार परिषद बोलावली आणि धक्कादायक खुलासा केला. सलमान खान याने विवेक याला रात्री 12.30 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत 40 फोन केले. तेव्हा सलमानने विवेक याला शिव्य देखील दिल्या…
रिपोर्टनुसार, विवेकची अशी वागणूक ऐश्वर्या हिला बिलकूल आवडली नाही. ज्यामुळे ऐश्वर्या – विवेक यांच्या नात्यात देखील फूट पडली. त्यानंतर ऐश्वर्या आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची ओळख झाली. हळूहळू ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांचं लग्न झालं.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नानंतर विवेक याला दोघांच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं. पण विवेकने यावर बोलणं टाळलं. ‘ऐश्वर्याचं आता लग्न झालं आहे… त्यावर काही बोलायला नको…’ असं विवेक म्हणाला होता. पण आजही दोघांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते.
मीडिया रिपोर्टनुसार, 2009 च्या मध्ये विवेक आणि प्रियंका अल्वा यांची भेट झाली. विवेक ओबेरॉय प्रियांकाला पाहताच तिच्या प्रेमात पडला आणि त्याने तिला लग्नासाठी प्रपोजही केलं. 29 ऑक्टोबर 2010 रोजी दोघांचं लग्न झालं. प्रियांका कर्नाटकचे माजी विधानसभा सदस्य जीवराज अल्वा यांची मुलगी आहे. प्रियांका आणि विवेक यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. विवेकचं कुटुंब लाईमलाईटपासून दूर असतं.