Love Life : फसवणूक, भावाच्या मित्रावर प्रेम, लग्नाआधी प्रेग्नेंट; कुठे आहे ‘परदेस’ फेम महिमा चौधरी?
Love Life : 'या' प्रसिद्ध खेळाडूनंतर भावाच्या मित्रावर जडला अभिनेत्रीचा जीव...लग्नाआधी प्रेग्नेंट राहिली त्यानंतर मात्र... महिमा चौधरी हिचं खडतर आयुष्य, आता कुठे आहे अभिनेत्री?
मुंबई : 13 सप्टेंबर 2023 | ९० च्या दशकात एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत अनेक अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आल्या. पण त्यांच्या आयुष्यात अशी एक वेळ आली, जेव्हा त्यांनी अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. असाच प्रसंग अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘परदेस’ सिनेमातील अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) हिच्या आयुष्यात आला. महिमा ‘परदेस’ सिनेमातून एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आली, पण खासगी आयुष्यात मात्र तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. आता अभिनेत्री कुठे आहे, काय करते? याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
महिमा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीच्या आयुष्यात एका प्रसिद्ध खेळाडूची एन्ट्री झाली. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. आज महिमा हिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेवू अभिनेत्रीसोबत नक्की झालं तरी काय. सध्या सर्वत्र महिमा चौधरी हिची चर्चा रंगत आहे.
यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्री टेनिसपटू लिएंडर पेस यांच्या प्रेमात पडली. आपल्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणून महिमा टेनिसपटू लिएंडर पेस यांना पाहत होती. पण लिएंडर पेस यांनी अभिनेत्रीची फसवणूक करुन मॉडेल रिया पिल्लई हिला डेट करण्यास सुरुवात केली. अशात महिमा हिने खेळाडूसोबत असलेलं नातं संपवलं…
त्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली. भावाचा मित्र बॉबी मुखर्जी याच्या प्रेमात अभिनेत्रीने पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात केली. बॉबी आणि महिमा यांची ओळख एका कार्यक्रमात झाली. त्यानंतर पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर १९ मार्च २००६ मध्ये बॉबी आणि महिमा यांनी गुपचूप लग्न केलं.
पण लग्नाची घोषणा करण्याआधी अभिनेत्रीचं बेबी बम्प समोर आलं, तेव्हा महिमा हिला बॉबीसोबत केलेल्या सिक्रेट लग्नाबद्दल सांगावं लागलं. लग्नाआधीच महिमा प्रेग्नेंट राहिल्याची तुफान चर्चा रंगली. त्यामुळे महीमा आणि बॉबी यांनी गुपचूप आणि लवकर लग्न उरकलं . त्यानंतर २००७ साली महिमाने गोंडस मुलीला जन्म दिला.
काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हिमा आणि बॉबी यांनी २०१३ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बॉबी आणि महिमा यांचा घटस्फोट झाला नसला तर दोघे एकत्र राहत नाही. तर महिमा १५ वर्षीय मुलीचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करते. सध्या सर्वत्र महिमा चौधरी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.