Har Har Shambhu : ‘हर हर शंभू’ फेम गायिकेच्या भावाची हत्या; नातेवाईकांनीच साधला डाव

Har Har Shambhu : नातेवाईकांनीच का केली 'हर हर शंभू' फेम गायिकेच्या भावाची हत्या? कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का.. हत्या प्रकरणी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक देखील केली आहे.

Har Har Shambhu : 'हर हर शंभू' फेम गायिकेच्या भावाची हत्या;  नातेवाईकांनीच साधला डाव
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 2:44 PM

मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : गायक आणि प्रसिद्ध युट्यूबर फरमानी नाझ हिच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल. ‘हर हर शंभू’ गाण्यामुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या फरमानी हिने ‘इंडियन आयडल’ मध्ये देखील नशीब आजमावण्याचा प्रयत्न केलाय पण काही कारणांमुळे फरमानी हिला शा बाहेर यावं लागलं. आता फरमानी तिच्या गाण्यामुळे नाही तर, धक्कादायक कारणामुळे चर्चेत आली आहे. फरमानी हिच्या चुलत भावाची हत्या झाली आहे. म्हणून सर्वत्र खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे नातेवाईकांनीच डाव साधल्याची माहिती समोर येत आहे. कुटुंबातील हत्याकांडमुळे फरमानी तुफान चर्चेत आली आहे.

फरमानी हिच्या चुलत भावाच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. फरमानी हिच्या चुलत भावाची हत्या गायिकेचे वडील आणि भावाने केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. फरमानी हिच्या चुलत भावाची हत्या करणाऱ्यासाठी गायिकेच्या सख्या भावाने त्याच्या मेहुण्यांची देखील मदत घेतल्याची माहिती समोर येत आहे.

फरमानी हिच्या चुलत भावाची हत्या ऑगस्ट महिन्यात झाली आहे. तर त्याचे फरमानी हिच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्यात्या संशयावरुन हत्या करण्यात आल्याची चर्चा रंगत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक देखील केली आहे. अटक करण्यात चार लोकांकडून पोलीस अधिक माहिती काढून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलिसांनी घटनास्थळावरून २ चाकू आणि १ बाईक जप्त केली आहे. रिपोर्टनुसार, ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली. ३ अज्ञात दुचाकीस्वारांनी गायिकेच्या चुलत भावावर हल्ला केला. या घटनेत फरमानी हिच्या भावाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून फरमानी नातेवाईकांनी हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कोण आहे फरमानी नाझ

फरमानी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मोहम्मदपूर माफी नावाच्या एका छोट्या गावातील रहिवासी आहे. 2017 मध्ये फरमानी नाजने मेरठच्या छोटा हसनपूर गावात पती इम्रानसोबत लग्न केले. फरमानी ही YouTuber आहे. युट्यूबवर तिचे जवळपास 38.4 लाख सब्सक्रायबर आहेत. ‘हर हर शंभू’ गाण्यामुळे फरमानी एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.