Lagaan फेम अभिनेत्रीला 23 वर्षांनंतर ओळखणं कठीण, ‘तो’ व्हिडीओ थक्क करणारा, चाहते अवाक्
Lagaan: ही तिच मासून गौरी आहे का? 23 वर्षांनंतर 'लगान' फेम अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, आता अभिनेत्रीला ओळखणं देखील कठीण, सोशल मीडियावर अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल... सर्वत्र व्हिडीओची चर्चा...
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होवून गेल्या. ज्यांनी सौदर्य, अभिनय आणि डान्सने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेक वर्ष अभिनेत्रींनी बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण काही वर्षांनंतर अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर झाल्या आणि खासगी आयुष्यात रमल्या… असंच काही झालं आहे अभिनेत्री ग्रेसी सिंग हिच्यासोबत देखील… ग्रेसी सिंग हिने अनेक शो आणि सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्रीचे अनेक सिनेमा फ्लॉप झाले. पण तरी देखील अभिनेत्रीवर असलेलं चाहत्यांचं प्रेम कमी झालं नाही. अभिनेत्रीच्या एका स्माईलवर चाहते घायाळ व्हायचे. आता देखील ग्रेसी सिंग हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, ग्रेसी सिंग हिने दिग्दर्शक आफताब शिवदसानी यांचा सिनेमा ‘मुस्कान’ मध्ये काम केलं होतं. सिनेमातील गाणी प्रचंड हीट झाले, याच कारणामुळे ग्रेसी सिंग हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील फार मोठी वाढ झाली. पण तेव्हाच्या ग्रेसी सिंग मध्ये आणि आताच्या ग्रेसी सिंग हिच्यामध्ये फार फरक आहे.
View this post on Instagram
ग्रेसी सिंग हिच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रील ओळखणं देखील कठीण झालं आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या देखील जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सध्या सर्वत्र व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मुस्कान सिनेमा माझ्या बहिणीला फार आवडायचा. लहान असताना बहिणीसाठी सीडी प्लेयर आणि सीडी भाड्याने घेतली होती.’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘लगान, गंगाजल, मुस्कान… साधी अभिनेत्री कोणताच घमंड नसलेली…’, तर आणखी एक नेटकरी विनोदी अंदाजात म्हणाला, ‘अरे मामू जे तो अपनी चिंकी भाभी है..’
ग्रेसी सिंग हिचे सिनेमे…
ग्रेसी सिंग हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘लाउडस्पीकर’, ‘संतोषम’, ‘अरमान’, ‘देशद्रोही’, ‘लगान’, ‘अमानत’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर अभिनेत्री मालिकांमध्ये देखील काम केलं. ‘संतोषी मां’ मालिकेमुळे देखील अभिनेत्री प्रकाश झोतात आली.
View this post on Instagram
आज ग्रेसी सिंग बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ग्रेसी हिचे 145K फॉलोअर्स आहेत. तर अभिनेत्री फक्त 17 जणांना फॉलो करते.