‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत ‘राणा दा’ची होणार एण्ट्री; मालिकेत दिसणार ‘या’ भूमिकेत

शुभंकर ठाकूर असं या नव्या पात्राचं नाव असून त्याचं मोनिकासोबत खास नातं आहे. हे नातं नेमकं काय असेल हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. मात्र शुभंकरच्या एण्ट्रीने मालिकेत धमाकेदार वळण येणार हे मात्र नक्की.

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत 'राणा दा'ची होणार एण्ट्री; मालिकेत दिसणार 'या' भूमिकेत
‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत 'राणा दा'ची होणार एण्ट्रीImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 8:06 PM

मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. एकीकडे स्वराजच आपला मुलगा आहे हे सत्य मल्हारसमोर उलगडेल का याची उत्सुकता असताना आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. शुभंकर ठाकूर असं या नव्या पात्राचं नाव असून त्याचं मोनिकासोबत खास नातं आहे. हे नातं नेमकं काय असेल हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. मात्र शुभंकरच्या एण्ट्रीने मालिकेत धमाकेदार वळण येणार हे मात्र नक्की. सुप्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी शुभंकरची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

या नव्या भूमिकेबद्दल सांगताना हार्दिक जोशी म्हणाला, “स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझं जुनं नातं आहे. लक्ष्य, पुढचं पाऊल आणि दुर्वा या मालिकांमध्ये मी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या. जवळपास आठ वर्षांनी पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनीसोबत काम करण्याचा योग जुळून आला आहे. एखादं नवं पात्र जेव्हा मालिकेत येतं तेव्हा ते नवी गोष्ट घेऊन येतं. ते पात्र ती गोष्ट रंगवत असतं. शुभंकरच्या येण्याने मालिकेत नवं नाट्य रंगेल. परदेशी असलेला शुभंकर बिझनेसच्या निमित्ताने भारतात आला आहे. शुभंकर स्पष्टवक्ता असला तरी मनाने अतिशय हळवा आहे. त्याला इतरांनी केलेली मदत तो कधीच विसरत नाही. शुभंकरचं कामत कुटुंब आणि मोनिकासोबत नेमकं काय कनेक्शन आहे हे लवकरच उलगडेल.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

काही दिवसांपूर्वी मालिकेतमंजुळा सातारकरची धमाकेदार एण्ट्री झाली होती. मंजुळाच्या येण्याने स्वराजला आपली आई वैदेहीच परत आल्याची खात्री झाली होती. वैदेही सारखी दिसत असली तरी मंजुळा म्हणजे वैदेही नव्हे हे स्पष्ट झालं. पिहूला लोकसंगीत शिकवण्याच्या बहाण्याने तिने कामतांच्या घरात प्रवेश केला. यामागचा तिचा मनसुबा मात्र भलताच होता.

एरव्ही सर्वांवर आपली हुकुमत गाजवणाऱ्या मोनिकाला मंजुळा आपल्या हटके स्टाईलने उत्तर देताना दिसली. या भूमिकेसाठी मंजुळाने नवं रुपही धारण केलं होतं. साडी, ठसठशीत कुंकू आणि लक्ष वेधणारे दागिने असा काहीसा मंजुळाचा अंदाज मालिकेत पाहायला मिळाला. तुझेच मी गीत गात आहे ही मालिका रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.