‘नताशासोबत राहणं म्हणजे…’, हार्दिक पांड्या पूर्वीपासून होता पत्नीमुळे हैराण? व्हिडीओ व्हायरल
Natasa Stankovic - Hardik Pandya : ऐकाव ते नवलच... हार्दिक पांड्या पूर्वीपासून होता पत्नीमुळे हैराण? म्हणाला होता, 'नताशासोबत राहणं म्हणजे...', गेल्या काही दिवसांपासून नताशा - हार्दिक यांच्या खासगी आयुष्याची चर्चा... नातं पोहोचलं घटस्फोटापर्यंत...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून पत्नी नताशा स्टँकोव्हिच हिच्यासोबत होत असलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर सध्या फक्त नताशा – हार्दिक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण दोघांनी देखील यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण इंटरनेटवर हार्दिक याचं एक वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे. नताशासोबत राहण्यासाठी खूप संयम लागतो…. असं हार्दिक म्हणाला होता. ज्यामुळे हार्दिक पूर्वीपासून पत्नीमुळे हैराण होता का? अशा चर्चा देखील रंगल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर हार्दिक – नताशा यांच्या लग्नाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हार्दिक – नताशा स्वतःच्या लग्नाचा आनंद लुटताना दिसत आहे. लग्नाच्या वेळी हार्दिक म्हणाला होता, ‘ज्याप्रकारे नताशा हिने माझ्यावर प्रेम केलं आहे. त्यामुळे अनेक गोष्टी माझ्यासाठी स्पष्ट झाल्या आहेत. कठीण काळत धैर्य कसा बाळगावा हे नताशाने मला शिकवलं आहे.’
‘लव्ह लाईफमुळे मला माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत… मी पूर्वीपेक्षा अधिक संयमी झालो आहे. कारण नताशासोबत राहण्यासाठी खूप संयम लागतो…. ‘ असं हार्दिक म्हणाला होता. सांगायचं झालं तर, नताशा हिने इन्स्टाग्रामवरून ‘पांड्या’ नाव काढल्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. पण हार्दिक आणि नताश खरंच विभक्त होणार आहेत का? यावर त्यांनी आणि कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.
हार्दीक आणि नताशा यांचं लग्न
हार्दिक पांड्या – नताशा स्टँकोव्हिच यांना 2020 मध्ये साध्या पद्धतीत लग्न करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. लग्नाच्या काही महिन्यांनंतर नताशा हिने मुलगा अगस्त्य याला जन्म दिला. पांड्या कुटुंब चाहत्यांना देखील आवडत होतं. त्यानंतर 2023 मध्ये हार्दिक – नताशा यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. एवढंच नाहीतर, हार्दिक, नताशा हिच्या कुटुंबियांना देखील लग्नाच्या दोन वर्षांनंतर भेटला होता.
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशा मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशा हिला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं. तिचा नवा बॉयफ्रेंड असेल.. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दरम्यान, नताशा हिला घटस्फोटाच्या चर्चांबद्दल देखील विचारण्यात आलं. पण नताशा हिने बोलणं टाळलं. नताशा फक्त ‘थँक्यू सो मच’ हे दोन शब्द म्हणाली आणि त्या मिस्ट्री मॅनसोबत निघून गेली.