हार्दिक पांड्याने केलीये नताशाची फसवणूक? धक्कादायक स्क्रिनशॉट समोर
Hardik Pandya - Natasa Stankovic: हार्दिक पांड्या - नताशा यांच्या घटस्फोटाचं कारण समोर, क्रिकेटपटूने केलीये पहिल्या पत्नीची फसवणूक? धक्कादायक स्क्रिनशॉट पाहून व्हाल हैराण..., सध्या सर्वत्र नताशा आणि हार्दिक यांच्या नात्याची चर्चा...
Hardik Pandya – Natasa Stankovic: भारतीय क्रिकेट संघाचा दमदार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त हार्दिक – नताशा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. हार्दिक आणि नताशा यांनी विभक्त होण्याचा निर्णय का घेतला? यावर चाहत्यांमध्ये अनेक प्रकारचे तर्क वर्तवण्यात आलं आहे. आता नताशा हिने असं काही केलंय ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे शिवाय हार्दिकने नताशाची फसवणूक केली का? असं देखील चाहते विचारत आहेत.
सांगायचं झालं तर, रेडिटवर काही पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नताशाने इन्स्टाग्रामवर फसवणूक आणि भावनिक छळ यांबाबत व्हायरल होणाऱ्या रिल्स लाईक केल्या आहेत. आता सोशल मीडियावर नताशा हिने लाईक केलेल्या पोस्टचे स्क्रिनशॉट देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.
स्क्रिनशॉट व्हायरल होत असल्यामुळे चाहत्यांकडून वेग-वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहे. नताशा सतत नात्यात फसवणूक झाल्याच्या पोस्ट लाईक्स करत आहेत. त्यामुळे हार्दिकने नताशाची फसवणूक केली का? असा प्रश्न देखील चाहते विचारत आहे.
हार्दिक आणि नताशा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 2020 मध्ये दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर दोघांनी साखरपुडा केला आणि त्याच वर्षी मुलगा अगस्त्य याचं जगात स्वागत केलं. त्यानंतर 2023 मध्ये नताशा आणि हार्दिक याने शाही थाटात लग्न केलं. तेव्हा दोघांचे कुटुंबिय देखील उपस्थित होते. पण नताशा आणि हार्दिक यांचं नातं फार काळ टिकलं नाही.
नताशा तिच्या मायदेशी निघून गेल्यानंतर हार्दिक याने घटस्फोटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. घटस्फोटानंतर नताशा तिच्या आईकडे आहे. सर्बियाची नताशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत अपडेट्स देत असते. नताशा – हार्दिक त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
नताशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर मुलासोबत खास क्षण व्यतीत करताना अभिनेत्री दिसते. शिवाय नताशा क्रिप्टिक पोस्टमुळे देखील चर्चेत असते. ली, ‘कधी कधी काही गोष्टी जाऊ द्याव्या लागतात… कारण देवाला तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. तुम्हाला जर वाटत असेल की देव ऐकतो का? तर तुम्हाला देखील देवाप्रती समर्पित व्हावं लागेल…’ अशी पोस्ट देखील अभिनेत्री केली होती.