हार्दिक पांड्यासोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल म्हणते, ‘माझ्यात काही तरी खास, म्हणून…’, पोस्ट चर्चेत
Hardik Pandyas Wife Natasa Stankovic: 'हार्दिक म्हणाला लग्न करायचंय म्हणजे करायचं...', क्रिकेटपटूसोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल व्हिडीओ पोस्ट करत म्हणते, 'माझ्यात काही तरी खास आहे म्हणून...', सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त मिस्ट्री गर्लच्या पोस्टची चर्चा...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी नताशा आणि हार्दिक यांच्यातील वाद चव्हाट्यावर पोहोचले आहेत. टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देखील नताशा हिने पती हार्दिक याला शुभेच्छा दिल्या नाहीत. याच दरम्यान, हार्दिक याचे मिस्ट्री गर्लसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होती. हार्दिक याच्यासोबत दिसणाऱ्या मिस्ट्री गर्लचं नाव प्राची सोलंकी असं आहे. हार्दिक याच्यासोबत फोटो व्हायरल झाल्यामुळे प्राची हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आता देखील प्राची हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, प्राचीच्या व्हिडीओने नाही तर, तिने व्हिडीओला दिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून धेकलं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत प्राची म्हणाली, ‘माझ्यामध्ये काहीतरी खास आहे, म्हणून काहीही न करता वादाच्या भोवऱ्यात अडकते…’ असं प्राची म्हणाली.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर प्राचीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी देखील प्राचीच्या व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘हार्दिक भाईसोबत लग्न केलं तर, वाद होतील.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हार्दिक भाई म्हणाला लग्न करायचं म्हणजे लग्न करायचं…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हार्दिक पांड्याचे वाद असतील…’
कोण आहे प्राची सोलंकी?
सोशल मीडियावर हार्दिक पांड्यासोबत असलेल्या मिस्ट्री गर्लची चर्चा रंगत आहे, ती मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून प्राची सोलंकी आहे. प्राची सोलंकी प्रसिद्ध सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. प्राची सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर प्राची हिला 600K नेटकरी फॉलो करतात. सांगायचं झालं तर, हार्दिक पांड्यासोबत फोटो व्हायरल झाल्यापासून प्राचीच्या चाहत्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात वाद?
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशा विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देखील नताशा हिने पती हार्दिक याला शुभेच्छा दिल्या नाही. नताशा आणि हार्दिक यांनी रंगणाऱ्या चर्चांवर अधिकृत घोषणा केलेली नाही. पण नताशा सोशल मीडियावर कायम क्रिप्टिक पोस्ट शेअर करत असते.
दरम्यान, विजयी होऊन घरी परतल्यानंतर हार्दिक याने मुलासोबत आनंद साजरा केला. पण तेव्हा नताशा नसल्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल देखील केलं. पण दोघे घटस्फोट घेणार आहेत की नाही? यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.