भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे तुफन चर्चेत आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करून हार्दिक पांड्याने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. प्रोफेशनल आयुष्यात हार्दिक याने मोठं यश मिळवलं आहे. पण खासगी आयुष्यात मात्र हार्दिक मोठ्या संकटांचा सामना करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि पत्नी स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांनी देखील यावर मौन बाळगलं आहे. पण नताशा सोशल मीडियावर कायम काहीना काही तरी पोस्ट करताना दिसत आहे.
नताशा लाईमलाईट पासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असते. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करत असते. आता देखील नताशा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कायम दुसऱ्या आयुष्यावर जजमेंट करणाऱ्या लोकांसाठी नताशा हिने खास व्हिडीओ तयार केला आहे.
व्हिडीओमध्ये नताशा म्हणते, ‘कॉफी पित होती तेव्हा माझ्या मनात एक विचार आला, की लोकं कसं लगेच कोणाबद्दल जजमेंटल होतात. आपल्या आजू-बाजूला काय सुरु आहे, या गोष्टीचा ती व्यक्ती फक्त अभिनय करत असते. जर कोणी आपल्याप्रमाणे वागत नसेल, तर लोकं न थांबता, न विचार करता काहीही बोलत सुटतात… त्या व्यक्तीच्या मनातील भावना आपण समजून घेतच नाही…’
‘त्यामुळे मला म्हणायचं आहे की, आपण थोडं कमी जजमेंटल असायला हवं.. संयम ठेवून समोरच्या व्यक्तीची परिस्थिती आणि त्याच्या मनातील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करू…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र नताशा हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
टी20 वर्ल्ड कप जिंकल्यापासून सर्वत्र हार्दिक पांड्या याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण हार्दिक याच्या पत्नीने त्याला शुभेच्छा देखील दिल्या नाही. ज्यामुळे सोशल मीडियावर नताशा हिला ट्रोल करण्यात आलं. घटस्फोटाच्या चर्चा सुरु असल्यामुळे नताशा हिने पतीला शुभेच्छा दिल्या नाहीत का? अशी चर्चा देखील चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर सुरु आहे.