हार्दिक पांड्या याचा घटस्फोट? ‘त्या’ व्हिडीओमध्ये पत्नी नताशा भावूक, म्हणाली, देव फक्त…
हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. हार्दिक पांड्याच्या खासगी आयुष्यात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. हार्दिक पांड्या याची पत्नी नताशा ही सोशल मीडियावर सतत पोस्ट शेअर करताना दिसत आहे. हार्दिक पांड्याचा घटस्फोट झाल्याचे देखील सांगितले जात आहे.
T20 वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी करताना हार्दिक पांड्या दिसला. मात्र, दुसरीकडे हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघ भारतामध्ये परतलाय. जोरदार स्वागत दिल्लीसह मुंबईत संघाचे करण्यात आले. हार्दिक पांड्या याने T20 वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी केलीये. हार्दिक पांड्या याचे देखील खास पद्धतीने स्वागत करण्यात आले. हार्दिक पांड्या आणि त्याच्या मुलाचे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले. मात्र, हार्दिक पांड्या याची पत्नी नताशा ही यावेळी उपस्थित नव्हती.
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात वाद असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. हेच नाहीतर यांचा घटस्फोट झाल्याचेही सांगितले जातंय. हेच नाहीतर भारतीय संघाने T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर साधी एक पोस्टही नताशा हिने सोशल मीडियावर शेअर केली नसल्याने लोक हैराण झाले.
सतत घटस्फोटाची चर्चा असताना नताशा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. आता नुकताच नताशा हिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केलाय. नताशा हिने या व्हिडीओमध्ये म्हटले की, मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते की, देवाने लाल समुद्र हटवला नाही, त्याने फक्त त्याचे विभाजन केले आहे.
याचा अर्थ असा आहे की देव तुमच्या जीवनातून कधीही कोणतीही समस्या दूर करणार नाही, तो फक्त त्यातून रस्ता काढेल. आता नताशा हिचा हा व्हिडीओ पाहून परत एकदा विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच नताशाने एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, एक व्यक्ती लवकरच रस्त्यावर येणार आहे. अंबानींच्या पार्टीमध्ये हार्दिक पांड्या पत्नी नताशा हिच्यासोबत पोहोचेल अशी आशा सर्वांनाच होती.
मात्र, हार्दिक पांड्या हा चक्क भाऊ आणि वहिणीसोबत अंबानींच्या पार्टीमध्ये पोहोचला होता. नताशा ही हार्दिक पांड्या याला सपोर्ट करण्यासाठी कायमच स्टेडियममध्ये येत होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून नताशा ही हार्दिक पांड्याला सपोर्ट करण्यासाठी येत नाहीये. नताशा ही पोस्टच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करताना देखील दिसत आहे.