हार्दिक पांड्याच्या पत्नीसोबत अफेअर, आता ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट, अभिनेत्याने अजूनही लग्नाचा…

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे सातत्याने सांगितले जातंय. नताशा स्टेनकोविक हिने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. हार्दिक पांड्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर नताशा एका मोठ्या अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

हार्दिक पांड्याच्या पत्नीसोबत अफेअर, आता 'या' अभिनेत्रीला करतोय डेट, अभिनेत्याने अजूनही लग्नाचा...
Natasa Stankovic
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 12:01 PM

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सातत्याने सांगितले जाते. यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे सांगितले गेले. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेनकोविक ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना नताशा स्टेनकोविक ही दिसते. नताशा स्टेनकोविक हिने बॉलिवूड चित्रपटामध्येही काम केले आहे. मोठी फॅन फॉलोइंग नताशा स्टेनकोविक हिची सोशल मीडियावर बघायला मिळते.

नताशा स्टेनकोविक ही हार्दिक पांड्या याला डेट करण्याच्या अगोदर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यासोबत रिलेशनमध्ये होती. अली गोनी 2014 मध्ये नताशा हिच्यासोबत रिलेशनमध्ये होता. त्यानंतर यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. अली गोनीने त्यावेळी सांगितले की, काही गोष्टींमध्ये दोघांच्या मतामध्ये खूप फरक होता. 

हेच नाही तर दोघांची संस्कृती आणि धर्मही वेगळा आहे. यावरूनच दोघांमध्ये मतभेद झाले. त्यामुळेच आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अली गोनी याच्यापासून वेगळे झाल्यानंतर नताशा स्टेनकोविक हिने हार्दिक पांड्याला डेट केले आणि त्याच्यासोबत लग्न देखील केले. हार्दिक आणि नताशाने अगोदर कोर्टात लग्न केले. 

नताशा स्टेनकोविक हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यापासून अली गोनी हा अभिनेत्री जास्मिन भसीन हिला डेट करतोय. विशेष म्हणजे दोघे चांगले मित्र होते आणि त्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले. बिग बॉस 14 मध्ये जास्मिन हिला सपोर्ट करण्यासाठी अली गोनी पोहोचला होता. यावेळी लोकांना अली गोनी आणि जास्मिनची जोडी देखील प्रचंड आवडली.

अली गोनी आणि जास्मिन भसीन हे लवकरच लग्न करणार असल्याची मध्यंतरी जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मात्र, त्यानंतर जास्मिन भसीन हिने मोठा खुलासा केला. जास्मिन भसीन हिने स्पष्ट केले की, माझा आणि अलीचा सध्याच लग्न करण्याचा कोणत्याच विचार नाहीये. अजून आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायच्या राहिल्या आहेत. मी किंवा अली लग्न करण्यासाठी मुंबईत आलो नव्हतो तर आमची काही स्वप्न घेऊन मुंबईत आलो होतो. ज्यावेळी आम्हाला वाटेल की, ती स्वप्न आता पूर्ण झाली आहेत, त्यावेळी आम्ही लग्न करू.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.