माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांचं 68 व्या वर्षी तिसरं लग्न; भडकला अभिनेता, म्हणाला ‘मुस्लिमांना बदनाम..’

देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी नुकतंच तिसरं लग्न केलं. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी तिसरं लग्न केलं असून त्यावरून एका अभिनेत्याने ट्विट केलं आहे.

माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांचं 68 व्या वर्षी तिसरं लग्न; भडकला अभिनेता, म्हणाला 'मुस्लिमांना बदनाम..'
हरीश साळवे यांच्या तिसऱ्या लग्नावरून बॉलिवूड अभिनेत्याचं ट्विट चर्चेतImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 1:57 PM

नवी दिल्ली | 4 सप्टेंबर 2023 : देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि सर्वांत महागड्या वकिलांपैकी एक असलेले हरीश साळवे यांनी वयाच्या 68 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. ब्रिटीश मूळच्या त्रिना नावाच्या महिलेशी त्यांचं हे लग्न नुकतंच पार पडलं. या लग्नाला नीता अंबानी, ललित मोदी आणि उज्ज्वला राऊत यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. हरीश साळवे त्यांच्या या तिसऱ्या लग्नामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. यादरम्यान एका बॉलिवूड अभिनेत्याचं ट्विट चर्चेत आलं आहे. हरीश साळवे यांच्या लग्नावरून अभिनेत्याने ट्विट केलं आहे. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

हरीश साळवे यांच्या तिसऱ्या लग्नावरून अभिनेत्याचं ट्विट

हरीश साळवे यांच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करत संबंधित अभिनेत्याने लिहिलं, ‘मुस्लिमांना बदनाम केलं जातं. ही लोकं खरी मजा घेतात. वकील हरीश साळवे यांनी तिसरं लग्न केलंय.’ हे ट्विट करणारा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमार आर. खान ऊर्फ केआरके आहे. या ट्विटवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘लपूनछपून गर्लफ्रेंड ठेवण्यापेक्षा लग्न करणं काय वाईट आहे? साळवे यांनी योग्यच केलं’, असं एकाने लिहिलं. तर ‘मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी त्यांचं नाव असणंही गरजेचं आहे’, असा उपरोधिक टोला दुसऱ्या युजरने लगावला.

हे सुद्धा वाचा

हरीश साळवे यांचं लग्न

हरीश साळवे यांनी मीनाक्षी यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांचा संसार तब्बल 38 वर्षे चालला होता. 2020 मध्ये हे दोघं विभक्त झाले. हरीश आणि मीनाक्षी यांना दोन मुली आहेत. मीनाक्षी यांना घटस्फोट दिल्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी ब्रिटिश कलाकार कॅरोलीनशी दुसरं लग्न केलं. ऑक्टोबर 2020 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.

महत्त्वपूर्ण खटले

हरीश साळवे हे बऱ्याच हाय-प्रोफाइल केसेसचा भाग होते. सलमान खानला काळवीट शिकारप्रकरणी तीन दिवसांत अंतिम जामिन मिळवून देणारे वकील हरीश साळवेच होते. याशिवाय त्यांनी सलमान खानच्या हिट अँड रन खटल्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. इतकंच नव्हे तर पाकिस्तानमध्ये मृत्यूची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांचाही खटला हरीश साळवे यांनी लढवला होता. यासाठी त्यांनी भारत सरकारकडून फक्त एक रुपये फी घेतली होती.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.