विकी कौशलसोबतच्या अफेअरबद्दल व्यक्त झाली एक्स गर्लफ्रेंड; म्हणाली “मी अजूनही वाट..”

अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न करण्यापूर्वी विकी कौशल हा हरलीन सेठीला डेट करत होता. सोशल मीडियावर हे दोघं एकमेकांसाठी मोकळेपणे प्रेम व्यक्त करायचे. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हरलीन विकीविषयी व्यक्त झाली.

विकी कौशलसोबतच्या अफेअरबद्दल व्यक्त झाली एक्स गर्लफ्रेंड; म्हणाली मी अजूनही वाट..
Harleen Sethi and Vicky KaushalImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 1:53 PM

अभिनेता विकी कौशलने कतरिना कैफशी लग्न केलं असलं तरी एकेकाळी त्याचं नाव अभिनेत्री हरलीन सेठीसोबत जोडलं गेलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हरलीन तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. भूतकाळासाठी कृतज्ञ असून त्याच गोष्टींवर अडकून पडलं नसल्याचं तिने स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे हरलीनने तिचं रिलेशनशिप स्टेटस सध्या ‘सिंगल’ असल्याचं सांगत ‘मिस्टर राइट’ची म्हणजेच योग्य व्यक्तीची प्रतीक्षा करत असल्याचं म्हटलंय. 2019 च्या सुरुवातीपर्यंत हरलीन आणि विकी हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. हरलीन आता सिंगल असून विकीने 2021 मध्ये कतरिनाशी लग्न केलं.

‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत हरलीन म्हणाली, “माझ्या मते तुम्ही आयुष्यात जे अनुभवता, त्यातूनच तुमचं खरं व्यक्तीमत्त्व घडतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं तुम्ही आभार मानणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या आयुष्यात जे-जे लोक येतात, त्यापैकी काहीजण तुम्हाला अनुभव देतात आणि काही शिकवण देऊन जातात. मी त्या सर्व गोष्टींसाठी कृतज्ञ आहे. पण एखाद्या गोष्टीवर अडकून बसण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकाचा स्वत:चा वेगळा प्रवास असतो आणि ते जहाज निघून गेलं आहे. त्यामुळे तर ते जहाज जाऊ द्या, त्याला सुंदर प्रवास करू द्या आणि तुम्ही फक्त सर्फींग करत प्रवासाचा आनंद घ्या. तुमचा स्वत:चा एक वेगळा प्रवास आहे.”

हे सुद्धा वाचा

या मुलाखतीत हरलीन तिच्या आयुष्याबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाली. “आयुष्यात मी सध्या ज्या ठिकाणी आहे, तिथे खुश आहे. मी अजूनही खास व्यक्तीची वाट पाहतेय. प्रेम ही सर्वांत सुंदर गोष्ट असते, सुंदर भावना असते. मी ज्या ज्या लोकांना भेटते, त्यांच्याशी प्रेमानेच वागते. त्यामुळे ते प्रेम फक्त एकाच व्यक्तीसाठी आहे, अशी गोष्ट नाही. तुम्ही फक्त प्रेमाने वागा, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ती व्यक्ती किंवा ते प्रेम तुमच्या आयुष्यात येईलच”, असं ती पुढे म्हणाली.

विकीबद्दल व्यक्त होण्याची हरलीनची ही पहिलीच वेळ नाही. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत हरलीन म्हणाली, “प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, मला त्याने फरक पडला नाही. पण माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रिणींना फरक पडला. एक व्यक्ती म्हणून आपल्या सर्वांची वेगळी ओळख असते. फक्त एका अभिनेत्याशी माझं नाव जोडलं गेलं आणि आतापर्यंत मी कोणताही चित्रपट केला नाही म्हणून माझी ओळख कमी होत नाही. माझं स्वत:वर खूप प्रेम आहे. मला हरलीन सेठी याच नावाने ओळखलं गेलेलं आवडेल. एखाद्याला एखाद्याची एक्स गर्लफ्रेंड किंवा एखाद्याचा एक्स बॉयफ्रेंड म्हणणं चुकीचं असेल. मी कोणाचीच एक्स, आताची किंवा भविष्याची गर्लफ्रेंड नाही. मी हरलीन सेठी आहे.”

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.