थेट ‘या’ व्यक्तीने उडवली सलमान खानच्या भावांची खिल्ली, म्हणाला, 30- 40 वर्षे काय केले, कधी म्हणता..
सलमान खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सलमान खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. नुकताच सलमान याच्या भावांबद्दल मोठे विधान हे करण्यात आले.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही नक्कीच बघायला मिळते. हेच नाही तर सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. फक्त सलमान खान हाच नाही तर सलमान खान याचे भाऊ देखील कायमच चर्चेत दिसतात. काही दिवसांपूर्वी सलमान खान याचा भाऊ अरबाज खान याचे लग्न केले. विशेष म्हणजे अरबाज खान याने वयाच्या 56 वर्षी लग्न केले. बिग बाॅस 17 मध्येही अरबाज खान आणि सोहेल खान घरातील सदस्यांचे मनोरंजन करताना दिसले.
नुकताच थेट तोंडावर अरबाज खान आणि सोहेल खान यांना बाॅलिवूडमध्ये 30- 40 वर्षे काय केले हा प्रश्न विचारण्यात आला. हर्ष गुजरालच्या काॅमेडीशोमध्ये अरबाज खान आणि सोहेल खान हे पोहचले होते. यावेळी हर्ष गुजराल हा थेट तोंडावरच अरबाज आणि सोहेल यांची खिल्ली उडवताना दिसला. हर्ष गुजराल याचे हे बोलणे ऐकून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे देखील बघायला मिळाले.
अरबाज खान आणि सोहेल खान यांच्या फ्लाॅप करिअरबद्दलचे थेट बोलताना हर्ष गुजराल दिसला. तो थेट म्हणाला की, 30- 40 तुम्ही बाॅलिवूड क्षेत्रामध्ये काय करत आहात हे कळतच नाहीये. सकाळी बोलतात की, आम्ही अभिनेते आहोत. दुपारी बोलतात की, आम्ही प्रोड्युसर आहोत. सायंकाळी म्हणतात की, आम्ही डायरेक्टर आहोत.
रात्री जेंव्हा माहोल तयार होतो त्यावेळी म्हणतात की, आम्ही सलमान खान आहोत. हर्ष गुजराल याचे हे बोलणे ऐकून सोहेल आणि अरबाज हे जोरजोरात हसताना दिसत आहेत. यानंतर अरबाज खान हा थेट हात जोडताना देखील दिसतोय. हेच नाही तर अरबाज खान याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कमेंट करताना देखील हर्ष गुजराल दिसतोय.
आता या शोचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हर्ष गुजराल याचा हा स्टॅंडअप काॅमेडी शो धमाल करणार हे आता नक्कीच आहे. थेट सलमान खानच्या भावांनाच हर्ष गुजराल याने टार्गेट केल्याचे बघायला मिळतंय. लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो, असे सांगितले जात आहे.