सुबोध भावे-तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार? ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

लग्नाआधीची पहिली भेट, थोडीशी लेट पण झालीय मात्र एकदम थेट.. असं भन्नाट कॅप्शन देत अभिनेता सुबोध भावेनं त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर पोस्ट केला आहे. 'हॅशटॅग तदेव लग्नम' असं या चित्रपटाचं नाव आहे. यामध्ये सुबोधसोबत तेजश्री प्रधान मुख्य भूमिका साकारतेय.

सुबोध भावे-तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार? 'हॅशटॅग तदेव लग्नम'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
तेजश्री प्रधान, सुबोध भावेImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 12:40 PM

शुभम फिल्म प्रॉडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात पहिल्यांदाच अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. नुकत्याच झळकलेल्या या जबरदस्त टीझरमधून लग्न या विषयावर आधुनिक पिढीचा वेगळा दृष्टीकोन पाहायला मिळत आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये घरच्यांच्या सांगण्यानुसार दोन मध्यमवयीन ‘तरुण तरुणी’ लग्नासाठी ‘पाहाण्याच्या कार्यक्रमा’निमित्ताने भेटत आहेत. यावेळी ते एकमेकांच्या वयाचा अंदाज बांधताना दिसत आहेत. टीझरमधील संवाद मजेशीर असून प्रेक्षकांच्या मनात घर करणार आहेत. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची केमिस्ट्री या टीझरमध्ये खुलून दिसत आहे. त्यामुळे आता थोडीशी लेट पण एकदम थेट सुरू झालेली ही सफर पाहायला मजा येणार आहे. यात सुबोध भावे, तेजश्री प्रधान यांच्यासह प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केलं असून निर्माते शेखर विठ्ठल मते आहेत.

हे सुद्धा वाचा

चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले याविषयी म्हणाले, “हा चित्रपट आजच्या काळातील लग्न आणि नातेसंबंधांच्या बदलत्या संकल्पनेवर आधारित आहे. आत्ताच्या पिढीच्या विचारसरणीत मोठा बदल झाला असून हाच विचार चित्रपटात मांडला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल अशी आशा आहे.” तर निर्माते शेखर विठ्ठल मते म्हणाले, ” हा चित्रपट आजच्या काळाचा असून तो संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा आहे. काळानुसार तरुणांची विचारसरणी बदलत चालली असून त्यामागे त्यांची काही ठोस कारणे आहेत. तरुणाईचे हेच विचार यात मांडण्यात आले आहे. आपल्यापैकी अनेकांना हा चित्रपट आपल्या जवळचा वाटेल.”

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....