Bangladesh Protests: कट – हत्या – राजकारण, शेख हसीना याचं खरं आयुष्य दाखवणारे सिनेमे
Bangladesh Protests: कट करून कुटुंबियांची हत्या, शेख हसीना यांच्या आई - वडिलांचा आणि 3 भावांची हत्या, आयुष्यात अनेक उतार - चढाव पाहिलेल्या शेख हसीना यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शेख हसीना यांची चर्चा...
Bangladesh Protests: शेजारी राष्ट्र बांगलादेशात हिंसेची आग पेटली आहे. बांगलादेशमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. यात अनेकांनी आपले प्राण देखील गमावले आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन आता इतक्या टोकाला पोहोचलं आहे की, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देत भारतात यावं लागलं आहे. सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा शेख हसीना यांच्या आयुष्यात मोठं संकट आलं आहे. याआधी देखील शेख हसीना यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहे. शेख हसीना यांनी स्वतःच्या आई-वडिलांना आणि भावांना देखील गमावलं आहे. त्यांच्या आयुष्यावर आतापर्यंत सिनेमे देखील तयार झाले आहेत. ज्यामुळे शेख हसीना यांच्या आयुष्यात देखील सर्वांच्या समोर आले…
हसीना: अ डॉटर्स टेल… दिग्दर्शक पिपलू खान याच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सिनेमात शेख हसीना यांचं आयुष्य हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सिनेमात खुद्द शेख हसीना बोलताना दिसत आहेत. 70 मिनिटांचा सिनेमा 16 नोव्हेंबर 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. रिपोर्टनुसार, बंगाली भाषेत साकारण्यात आलेल्या सिनेमाचा बजेट 1.8 कोटी रुपये होता.
सिनेमात 1975 मध्ये शेख हसीना यांची वडील शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबातील बहुतेक सदस्यांची झालेली हत्या दाखवण्यात आली. शेख हसीना यांची बहीण शेख रेहाना देखील सिनेमात बोलताना दिसल्या होत्या. एका कटाचा भाग म्हणून त्याचे संपूर्ण कुटुंब कसे उद्ध्वस्त करण्यात आले हे सिनेमात सांगितलं आहे.
मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन… शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबावर आलेलं संकट दाखवणारा आणखी एक सिनेमा तयार करण्यात आला, सिनेमाचं नाव आहे मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन. बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. सिनेमात आरिफिन शुवू, नुसरत इमरोज तिशा, फजलुर रहमान बाबू, नुसरत फारिया, रियाज अहमद, दिलारा जमान मुख्य भूमिकेत होते.
‘मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन’ सिनेमा 23 ऑक्टोबर 2023 रोजी प्रदर्शित झाला. 178 मिनिटांचा सिनेमा 83 कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आला. तर बॉक्स ऑफिसवर सिनेमाने 41 मिलियन पर्यंत कमाई केली. सध्या सर्वत्र शेख हसीना यांची चर्चा रंगली आहे.
शेख हसीना यांचं जीवन
शेख हसीना यांचा जन्म 28 सप्टेंबर 1947 रोजी झाला. शेख हसीना त्यांच्या घरातील सर्वांत मोठ्या कन्या आहेत. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य ढाका येथे गेलं. हसीना यांनी कॉलेजमध्ये विद्यार्थी नेता म्हणून करियरला सुरुवात केली. राजकारणातील उभरता चेहरा म्हणून शेख हसीना यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण 1975 मध्ये घडलेल्या वाईट प्रसंगामुळे शेख हसीना पूर्णपणे खचल्या… शेख हसीना यांच्या आई – वडिलांना आणि 3 भावांची हत्या करण्यात आली…
शेख हसीना यांच्या कुटुंबातील अनेकांची हत्या करण्यात आली. पण त्यांचे पती वाजिद मिया आणि लहान बहीण शेख रेहाना यांचे प्राण वाचले. त्यानंतर शेख हसीना उच्च शिक्षणासाठी जर्मनी याठिकाणी गेल्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मायदेशी परतल्या आणि पक्षात प्रवेश केला.