‘सालार’चं आणखी एक दणकट पोस्टर पाहिलात का? प्रभासच्या नव्या फिल्मची उत्सुकता, केजीएफच्या फॅन्ससाठी नवी पर्वणी
दीडशे कोटी रुपये एवढं तगडं बजेट ह्या सिनेमाचं आहे आणि केजीएफ चॅप्टरचेच निर्माते सालारसाठी फंडींग करतायत. सिनेमा कन्नड, तेलुगूसह हिंदीतही डब केला जाणार आहे. त्यामुळे बाहुबलीसारखं काही तरी लार्जर दॅन लाईफ सिनेमा पहाण्याची संधी पुन्हा प्रेक्षकांना मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.
प्रभासचा(Prabhas) बाहुबली प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. त्यानंतर त्याचे काही हिंदी सिनेमे आले पण ते फार चालले नाहीत. साऊथमध्ये त्याच्या आणखी एका मोठ्या प्रोजेक्टची घोषणा झालीय. तो आहे ‘सालार’ नावाचा सिनेमा. ह्याच सिनेमाचं आज एक पोस्टर रिलिज करण्यात आलय. यात साऊथ स्टार जगपथी बाबू(Jagapathi Babu) हा एकदम रफ अँड टफ लूकमध्ये आहे.
जगपथी बाबू हा सालारमध्ये ‘राजामनार’ (Rajamanaar)ची भूमिका पार पाडतोय. पोस्टर मध्ये ज्या पद्धतीचा त्याचा लूक आहे तो पहाता तो एखाद्या कडवट भूमिकेत असल्याचं स्पष्ट जाणवतंय. सिनेमाची स्टोरी काय असेल याची उत्सुकता आहेच. पण त्याबद्दल सध्या तरी फार कुणी बोलत नाहीय. त्याची अधिकृत माहितीही उपलबद्ध नाही. सालारमध्ये प्रभास, जगपथी बाबूसोबतच श्रुती हसनही(Shruti Hasan)आहे.
प्रभासचं कन्नड पदार्पण 2 डिसेंबर 2020 मध्ये सालारची घोषणा करण्यात आली. हा एक अॅक्शन थ्रीलर सिनेमा आहे. प्रशांत नील (Prashant Neel) सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. हे तेच प्रशांत नील आहेत ज्यांनी केजीएफ चॅप्टर 1 (KGF Chapter 1) आणि केजीएफ चॅप्टर 2(KGF Chapter 2)सारखे सुपरहिट सिनेमा दिलेत. प्रभास-जगपथी बाबू आणि सोबत प्रशांत नील म्हणजेच अॅक्शनचा तडका असणार यात संशय नाही. तसच केजीएफच्या फॅन्ससाठीही ही मोठी पर्वणी असेल. प्रभास आणि प्रशांत नील एकत्र आल्यामुळे हे प्रभासचं कन्नड पदार्पण मानलं जातंय.
‘सालार’ कधी रिलिज होणार? सालार नेमकी कधी रिलीज होणार हा खरा प्रश्न आहे. निर्माते दिग्दर्शकांनी 14 एप्रिल 2022 ला फिल्म रिलिज होईल असं जाहीर केलेलं आहे. पण कोरोनामुळे अनेक गोष्टी बदलतायत, काही सिनेमांच्या रिलीज डेट पुढं ढकलण्यात येतायत. त्यामुळे जी तारीख जाहीर केलीय ती कायम असणार का याबाबत उत्सुकता आहेच. फिल्मचं 20 टक्के शुटींग पूर्ण झाली असून ती स्टोनमध्ये शुट करण्यात आलीय. तेलंगणातल्या गोदावरी जिल्ह्यात चालू वर्षाच्या सुरुवातीला शुटींग सुरु झाली. दीडशे कोटी रुपये एवढं तगडं बजेट ह्या सिनेमाचं आहे आणि केजीएफ चॅप्टरचेच निर्माते सालारसाठी फंडींग करतायत. सिनेमा कन्नड, तेलुगूसह हिंदीतही डब केला जाणार आहे. त्यामुळे बाहुबलीसारखं काही तरी लार्जर दॅन लाईफ सिनेमा पहाण्याची संधी पुन्हा प्रेक्षकांना मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.