रेखा यांच्याबद्दल असं का म्हणाले शेखर सुमन, ‘हजारो अभिनेत्री येतात आणि जातात पण…’

Shekhar Suman | रेखा यांच्याबद्दल शेखर सुमन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'हजारो अभिनेत्री येतात आणि जातात पण...', सध्या सर्वत्र त्यांच्या वक्तव्याची चर्चा, सध्या शेखर सुमन 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत असल्यामुळे नुकताच झालेल्या मुलाखतीत केलं मोठं वक्तव्य...

रेखा यांच्याबद्दल असं का म्हणाले शेखर सुमन, 'हजारो अभिनेत्री येतात आणि जातात पण...'
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 11:18 AM

बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ वेब सीरिजची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. सीरिजमुळे अनेक कलाकारांच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. अभिनेते शेखर सुमन यांचा देखील सीरिजमध्ये महत्त्वाचा सीन आहे. सीरिजमध्ये शेखर सुमन यांनी नवाब झुल्फिकर अहमद ही भूमिका बजावली आहे. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सीरिजमधील अभिनेत्रींचं कौतुक केलं. पण आता शेखर सुमन अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल बोलताना दिसले.

सांगयचं झालं तर, एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा यांनी देखील तवायफ महिलेची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं होतं. अशात शेखर सुमन रेखा यांच्याबद्दल असं काही बोलले, जे ऐकून चाहत्यांना देखील आनंद होईल. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शेखर सुमन यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात शेखर यांना रेखा यांच्याबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेते म्हणाले, ‘रेखा यांच्याबद्दल बोलायचं असेल तर, दुसरी मुलाखत घ्यावी लागेल. त्यांच्याबद्दल कमी बोलणं म्हणजे त्यांचा अनादर करण्यासारखं आहे. उत्तम अभिनेत्री मग त्यांचा आवाज असो किंवा मग त्यांचं गाणं आणि त्यांची शेरो-शायरी…’

हे सुद्धा वाचा

‘असं पाहायला गेलं तर हजारो अभिनेत्री येतात आणि जातात पण त्यांच्यानंतर एका रेखाचा जन्म होतो… प्रचंड कौशल्य, सुंदर, प्रेमळ…’ असं शेखर सुमन, रेखा यांच्याबद्दल म्हणाले. सांगायचं झालं तर, ‘संसार’ सिनेमातून शेखर यांनी रेखा यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

‘संसार’ सिनेमा शेखर यांची भूमिका फार मोठी नव्हती. पण त्यांच्या भूमिकेने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. रेखा यांच्यासोबत काम केल्यानंतर शेखर यांनी, रेखा यांना इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर महिला असल्याचं सांगितलं होतं. ज्यांचा फक्त चेहरा नाहीतर, मन देखील फार सुंदर आहे. शेखर सुमन यांनी केलेलं कौतुक जाणून रेखा देखील आनंदी झाल्या असतील…

रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, आजपर्यंत झगमगत्या विश्वात कोणतीच अभिनेत्री रेखा यांचं स्थान घेऊ शकलेली नाही. एक काळ असा होता जेव्हा फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील रेखा यांच्या सौंदर्यावर फिदा होते. आज रेखा 69 वर्षांच्या आहेत, तरी त्यांचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.