आलमजेब नव्हे तर खऱ्या आयुष्यात ‘हिरामंडी’चा ताजदार ‘या’ नॅशनल क्रशला करतोय डेट?

'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये ताजदारची भूमिका साकारलेल्या ताहा शाहने सर्वांचं लक्ष वेधलंय. सोशल मीडियावर तो तुफान लोकप्रिय झाला आहे. नुकतंच त्याला मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर 'नॅशनल क्रश'सोबत पाहिलं गेलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आलमजेब नव्हे तर खऱ्या आयुष्यात 'हिरामंडी'चा ताजदार 'या' नॅशनल क्रशला करतोय डेट?
Taha Shah BadusshaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 10:38 AM

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर एका चित्रपटाची आणि एका वेब सीरिजची जोरदार चर्चा आहे. ही वेब सीरिज म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ आणि चित्रपट म्हणजे किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’. या सीरिज आणि चित्रपटातील नव्या कलाकारांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. ‘हिरामंडी’मध्ये आलमजेबचा प्रियकर ताजदारची भूमिका साकारलेल्या ताहा शाहच्या लोकप्रियतेत रातोरात वाढ झाली आहे. तो केवळ नॅशनलच नाही तर इंटरनॅशनल क्रशही मानला जातोय. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘लापता लेडीज’मध्ये जयाची भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रतिभा रांटासोबत डिनर डेटवरून निघताना दिसतोय. त्यामुळे ताहा आणि प्रतिभा यांच्यात काही शिजतंय का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

किरण रावच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटानंतर अभिनेत्री प्रतिभा रांटालाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिलाही सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ मानलं जात आहे. विशेष म्हणजे प्रतिभाने ‘हिरामंडी’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवलेल्या या दोन्ही कलाकारांना जेव्हा एकत्र डिनर डेटवरून येताना पाहिलं, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, प्रतिभा आणि ताहा एका रेस्टॉरंटमधून बाहेर येतात आणि त्यानंतर पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देतात. त्यानंतर दोघं एकाच कारमध्ये बसून निघतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by dia (@ltwt2497)

प्रतिभा आणि ताहा दोघं एकत्र खूप चांगले दिसतायत, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर हे दोघं एकमेकांना डेट करू लागले आहेत का, असाही थेट प्रश्न काहींनी विचारला आहे. या दोन्ही कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. रातोरात सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढली. त्यामुळे प्रतिभा आणि ताहाला एकत्र पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

‘हिरामंडी’मध्ये ताजदार हा आलमजेबच्या प्रेमात पडतो. आलमजेबची भूमिका भन्साळींची भाची शार्मिन सेहगलने साकारली होती. मात्र तिचं अभिनय अनेकांच्या पसंतीस पडलं नाही. संपूर्ण सीरिजदरम्यान शार्मिनच्या चेहऱ्यावर एकाच प्रकारचे भाव होते, असं नेटकऱ्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे खऱ्या आयुष्यात ‘ताजदार’ला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पाहून नेटकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.