‘हिरामंडी’मधील आलमजेबचा पती हजारो कोटींचा मालक; कुटुंबाचा 50000 कोटींचा बिझनेस
'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये आलमजेबची भूमिका साकारणारी अभिनेत्री शार्मिन सेहगल सोशल मीडियावर विशेष चर्चेत आली आहे. तिच्या अभिनयावरून तिला खूप ट्रोल केलं जातंय. खऱ्या आयुष्या शार्मिन ही अब्जाधीश बिझनेसमनची पत्नी आहे.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची तुफान चर्चा होत आहे. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनिषा कोईराला, रिचा चड्ढा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, शार्मिन सेहगल, अध्ययन सुमन, फरदीन खान, शेखर सुमन यांसारख्या अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र या सर्वांत अभिनेत्री शार्मिन सेहगलला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातंय. संपूर्ण सीरिजमध्ये तिच्या चेहऱ्यावर काही विशेष हावभाव नव्हते आणि तिला आलमजेबची भूमिका जमली नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. शार्मिन ही भन्साळींची भाची असल्याने अनेकांचं लक्ष तिच्या अभिनयाकडे वेधलं गेलंय. शार्मिनने ‘मलाल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. तर ‘बाजीराव मस्तानी’, ‘गोलियों की रासलीला- रामलीला’, ‘मेरी कॉम’ यांसारख्या चित्रपटांसाठी तिने सहाय्यक दिग्दर्शिक म्हणून काम केलं होतं. सध्या शार्मिनसोबतच तिच्या पतीचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
शार्मिनने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमन मेहताशी लग्न केलं. अमनने आधी बिझनेस विश्वास चांगला अनुभव मिळवला आणि त्यानंतर त्याने कौटुंबिक व्यवसायात एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारली. अमन हा टोरंट ग्रुपची सब्सिडिअरी कंपनी टोरंट फार्मास्युटिकल्सचा एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. या ग्रुपची स्थापना त्याचे आजोबा यु. एन. मेहता यांनी 1959 मध्ये केली होती. या मल्टिनॅशनल कंपनीचं हेडक्वार्टर अहमदाबादमध्ये आहे. सध्या या कंपनीची मुख्य सूत्रे अमनचे वडील समीर मेहता आणि भाऊ सुधार मेहता यांच्या हातात आहेत. हे दोघंही कंपनीत को-चेअरमन पदावर आहेत. टोरंट ग्रुपअंतर्गत टोरंट फार्मा, टोरंट पॉवर, टोरंट केबल्स, टोरंट गॅस आणि टोरंट डायग्नोसिस या कंपन्यांचाही समावेश आहे.
View this post on Instagram
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, अमन मेहताचे वडील समीर मेहता यांची एकूण संपत्ती 6.1 अब्ज डॉलर्स (जवळपास 50,939 कोटी रुपये) इतकी आहे. या अब्जावधी व्यवसायात सर्वाधिक कमाई टोरंट फार्माची फ्लॅगशिप सब्सिडिअरी टोरंट फार्मामधून होते. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, टोरंट फार्माचा रेव्हेन्यू 4.6 अब्ज डॉलर्स (जवळपास 38,412 कोटी रुपये) इतका आहे. समीर आणि अमन या दोघांनी त्यांच्या कौटुंबिक व्यवसायातील फार्मा सेक्टरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे.
अमन मेहताने बोस्टन युनिव्हर्सिटीमधून इकोनॉमिक्समध्ये बॅचलर्सची डिग्री संपादित केली आहे. त्याने युएसच्या कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये एमबीएचं शिक्षण घेतलंय. एमबीए करण्याआधी अमनने टोरंट पॉवरमध्ये डिस्ट्रिब्युशन मॅनेजर म्हणून तीन वर्षांचा अनुभव घेतला. एमबीए पूर्ण केल्यानंतर त्याने CMO म्हणून टोरंट फार्मा कंपनीत प्रवेश केला. तीन वर्षे काम केल्यानंतर त्याचं प्रमोशन एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून झालं.