Heeramandi : अभिनेत्रींच्या मासिक पाळी दरम्यान संजय लिला भन्साळी यांनी घेतला मोठा निर्णय
Heeramandi : मासिक पाळीचा पहिला दिवस, शुट केला मुजरा, कशी होती वहीदा हिचा अवस्था... संजय लिला भन्साळी यांनी घेतला होता मोठा निर्णय... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजय लिला भन्साळी आणि अभिनेत्रींची चर्चा...
बॉलिवूडचे सर्वांत प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ सीरिजमध्ये अनेक कलाकारांना काम करण्याची संधी मिळाली. शुटिंग दरम्यान सर्वांचे वेगवेगळे अनुभव होत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्री संजीदा शेख हिने मासिळ पाळी दरम्यान आलेले अनुभव सांगितले आहे. सीरिजमध्ये संजीदा हिने वहीदा भूमिका साकारली आहे. संजीदा शेखने सांगितले की, तिने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी मुजरा सीन शूट केला होता. याशिवाय अभिनेत्रीने शूटिंगशी संबंधित तिचे अनुभवही शेअर केले आहेत.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, संजीदा हिने सांगितलं, मासिक पाळी दरम्यान मी कायम दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांना सांगत होती. याचं श्रेय अभिनेत्रीने तिच्या आईला दिलं. ‘माझी आई कायम तिच्या मासिक पाळीबद्दल तिच्या वडिलांना सांगायची. त्यामुळे मला देखील दिग्दर्शक, निर्माता, सह-कलाकारांना सांगण्याबद्दल काहीही वाटलं नाही. मला ही गोष्ट सामान्य वाटते…’
शुटिंगचा अनुभव शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी ‘हीरामंडी’ सीरिजसाठी माझा पहिला मुजरा शूट केला. जेव्हा मासिक पाळीचा दुसरा दिवस असतो, तेव्हा शारीरिक वेदना होतात. सतत चिडचीड होते. पण मी माझ्या कामात पूर्णपणे मग्न होती, त्यामुळे मला कधीच त्रास जाणवला नाही…’
View this post on Instagram
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी माझ्या मासिक पाळीबद्दल भन्साळी यांना सांगायची त्यामुळे माझ्यासाठी ते लवकर पॅकअप करायचे. मी त्यांना सांगितलं होतं थोडी अस्वस्थता आहे आणि जर मी थोडी विश्रांती घेतली तर मला दुसऱ्या दिवशी बरं वाटेल. स्वतःला व्यक्त करण्याची फार गरज आहे. नाही तर, तुम्ही कायम चिडचीड करता असं अनेकांचं मत होतं. पण का होत आहे हे आपणचं सांगायला हवं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
संजीदा शेख हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने याआधी अनेक प्रसिद्ध मालिका आणि सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. संजीदा टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
संजीदा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. घटस्फोटानंतर अभिनेत्री सिंगल मदर म्हणून लेकीचा सांभाळ करत आहे. अभिनेत्री कायम मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.