हेमा मालिनी यांचा 55 वर्ष जुना व्हिडीओ समोर, 20 वर्षीय अभिनेत्रीला पाहिल्यानंतर धर्मेंद्र…
Hema Malini | कधीही न संपणारं सौंदर्य... हेमा मालिनी यांचा 55 वर्ष जुना व्हिडीओ अखेर आला समोर, 20 व्या वर्षी कशा दिसत होत्या हेमा मालिनी? व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील नाही बसणार विश्वास..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांच्या सौंदर्याची चर्चा...

बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल म्हणजे अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. हेमा मालिनी फक्त त्यांच्या अभिनयामुळे नाही तर, नृत्य, सौंदर्यामुळे चर्चेक असतात. हेमा मालिनी या अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगनाही आहेत. जेव्हा हेमा मालिनी भरतनाट्यम करतात तेव्हा लोक त्यांच्याकडे कौशल्याकडे राहतात. आज हेमा मालिनी अभिनयापासून दूर आहे पण नृत्यापासून नाही. त्या अनेकदा मुली ईशा आणि आहानासोबत परफॉर्म करताना दिसतात.
हेमा मालिनी अनेक वर्षांपासून शास्त्रीय नृत्य करत आहेत. त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या भरतनाट्यम करताना दिसत आहेत. हेमा मालिनी यांच्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ जवळपास 55 वर्ष जुना आहे.




View this post on Instagram
व्हायरल होत असलेला व्हिडीओ 1968 वर्ष जुना आहे. तेव्हा हेमा मालिनी फक्त 20 वर्षांच्या होत्या. हेमा मालिनी शास्त्रीय नृत्यासाठी घातलेल्या ड्रेस आणि भारी दागिन्यांमध्ये सुंदर दिसत आहेत. नृत्य करताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव चाहत्यांचं मन जिंकत आहे. नेटकरी व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
हेमा मालिनी यांच्या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘त्या एक खऱ्या अप्सरा आहेत…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मला वाटलं की वैजयन्तीमाला आहेत….’ अनेकांना हेमा मालिनी यांचा व्हिडीओ आवडला आहे. अनेकांना धर्मेंद्र यांना देखील व्हिडीओ आवडला असेल असं म्हटलं आहे…
View this post on Instagram
हेमा मालिनी यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनयापासून दूर आता त्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी भाजपच्या मथुरेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. 2014 पासून हेमा मालिनी मथुरा येथे खासदार म्हणून कार्यरत आहेत.
dहेमा मालिनी आता बॉलिवूडपासून दूर असल्या तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हेमा मालिनी कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात.