Hema Malini : ‘ते’ भांडण झालं नसतं तर, आज प्रसिद्ध अभिनेत्यासोबत हेमा मालिनी यांचा असता सुखी संसार

Hema Malini : धर्मेंद्र नाहीतर, आज 'या' प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यासोबत हेमा मालिनी यांचा असता सुखी संसार, पण झालेल्या 'त्या' भांडणांमुळे मोडलं लग्न..., फार कमी लोकांना माहिती आहे, तेव्हा नक्की काय झालं होतं? हेमा मालिनी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत...

Hema Malini : 'ते' भांडण झालं नसतं तर, आज प्रसिद्ध अभिनेत्यासोबत हेमा मालिनी यांचा असता सुखी संसार
Follow us
| Updated on: May 17, 2024 | 9:16 AM

प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी किस्सा असतो, जो काही वर्षांनी आठवल्यानंतर हसायला येतं. पण जेव्हा घटना घडत असते तेव्हा मनात प्रचंड राग असतो. असंच काही झालं आहे अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत… हेमा मालिनी – धर्मेंद्र यांच्या लग्नाला 44 वर्ष झाली आहेत. पण तरी देखील धर्मेंद्र यांच्या घरात हेमा मालिनी यांनी प्रवेश केला नाही. कारण हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. पण हेमा मालिनी यांचं लग्न धर्मेंद्र यांच्यासोबत नाहीतर, अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत झालं असतं तर, आज हेमा मालिनी यांचा देखील सुखी संसार असता.

जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचं लग्न होणार होतं. पण त्यांच्या साखपुड्यात धर्मेंद्र गुपचूप पोहोचले. हेमा मालिनी यांचं लग्न त्यांच्या आई – वडिलांच्या इच्छेनुसार जितेंद्र यांच्यासोबत होणार होतं. पण ते होऊ शकलं नाही. हेमा मालिनी यांनी बायोग्राफी ‘बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ मध्ये जितेंद्र, धर्मेंद्र आणि त्यांच्यात घडलेली गोष्ट पुस्तकात सांगितली आहे.

एक काळ असा होता, जेव्हा हेमा मालिनी आणि जितेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. दोघांमध्ये चांगली मैत्री देखील झाली होती. हेमा मालिनी यांच्या आई – वडिलांना देखील जितेंद्र आवडत होते. पण तेव्हा जितेंद्र शोभा यांना डेट करत होते.

हे सुद्धा वाचा

तेव्हाच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. सांगायचं झालं तर, जितेंद्र तेव्हा शोभा यांना डेट करत असले तरी, हेमा मालिनी यांच्याबद्दल अभिनेत्याच्या मनात भावना होत्या. रिपोर्टनुसार, जितेंद्र यांचे आई – वडील हेमा मालिनी यांच्या घरी पोहोचले आणि दोघांच्या लग्नाची तयारी सुरु झाली होती. आई-वडिलांच्या आनंदासाठी हेमा आणि जितेंद्र यांच्या साखरपुड्याचं आयोजन करण्यात आलं. एवढंच नाहीतर, लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या.

त्यावेळी धर्मेंद्र दारूच्या नशेत, शोभा यांच्यासोबत मंडपात पोहोचले आणि जितेंद्र – हेमा मालिनी यांचं लग्न होऊ दिलं नाही. याबद्दल हेमा मालिनी यांनी अनेक मुलाखतींमध्ये खुलासा केला, पण जितेंद्र यांनी कायम मौन बाळगलं. हेमा मालिनी आणि जितेंद्र यांच्या साखरपुड्यात अनेक वाद झाले होते. ज्यामुळे नातं लग्नापर्यंत पोहोचलं होतं.

रिपोर्टनुसार, हेमा मालिनी यांना देखील कळून चूकलं होतं की, धर्मेंद्र त्यांचं लग्न दुसऱ्या कोणत्या पुरुषासोबत होऊ देणार नाहीत, म्हणून हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं. धर्मेंद्र – हेमा मालिनी यांच्या लग्नाला अभिनेत्रीच्या कुटुंबियांचा विरोध होता, कारण धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे वडील होते.

सांगायचं झालं तर, तेव्हा धर्मेंद्र आणि जितेंद्र यांच्यामध्ये वाद झाले, पण काही वर्षांनंतर दोघांची मैत्री घट्ट झाली. धर्मेंद्र आणि जितेंद्र यांनी ‘धर्म-वीर’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. तर हेमा मालिनी आणि जितेंद्र यांनी जवळपास 6 ते 8 सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. जितेंद्र यांचं लग्न शोभा यांच्यासोबत झालं. त्यांना दोन मुलं तुषार आणि एकता कपूर आहेत.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.