वयाच्या 75 व्या वर्षी हेमा मालिनी यांनी शास्त्रीय नृत्यावर धरला ताल; पंतप्रधान मोदी देखील पाहातच राहिले

Hema Malini : हेमा मलिनी यांचं शास्त्रीय नृत्यावर असलेलं प्रेम... वयाच्या 75 व्या वर्षी देखील त्यांनी धरला शास्त्रीय नृत्यावर धरला ताल; पंतप्रधान मोदी देखील पाहातच राहिले हेमा मालिनी यांच्या चेहऱ्यावरील हावभाव... व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

वयाच्या 75 व्या वर्षी हेमा मालिनी यांनी शास्त्रीय नृत्यावर धरला ताल; पंतप्रधान मोदी देखील पाहातच राहिले
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 12:25 PM

मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री हेमा मालिनी आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्यातरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. हेमा मालिनी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आता देखील हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हेमा मालिनी शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम करताना दिसत आहेत. वयाच्या 75 व्या वर्षी देखील हेमा मालिनी यांचं नृत्यावर असलेलं प्रेम कमी झालेलं नाही. आजही हेमा मालिनी तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने सर्वांसमोर स्वतःची कला सादर करताना दिसतात. नुकताच मधुरा याठिकाणा पार पडलेल्या मीराबाई यांच्या 525 व्या वाढदिवसानिमित्त नृत्य सादर केलं..

यावेळी मथुरा याठिकाणी अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. अशात हेमा मालिनी यांनी त्यांच्या शास्त्रीय नृत्य कलेने जमलेल्यांच्या मनावर राज्य केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. नेटकरी देखील व्हायरल व्हिडीओ पाहून प्रेम व्यक्त करत आहेत..

सांगायचं झालं तर, संत मीराबाई या श्रीकृष्णाच्या सर्वात मोठ्या भक्तांपैकी एक आहेत. त्यांचं श्रीकृष्ण यांच्यावर अफाट प्रेम होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण यांच्यावर असलेल्या प्रेमासाठी संत मीराबाई यांनी शाही आयुष्याचा त्याग केला आणि आध्यात्मिक मार्ग स्वीकारला. आजही कलाकार त्यांच्या कलेच्या मध्यमातून संत मीराबाई यांचा जीवन प्रवास सांगतात…

लहानपणापासून हेमा मालिनी यांना नृत्याची आवड

लहानपणापासून हेमा मालिनी यांना भारतीय शास्त्रीय नृत्याची आवड आहे. हेमा मालिनी यांच्या दोन मुली ईशा देओल आणि अहाना देओल देखील शास्त्रीय नृत्यांगना आहेत. हेमा मालिनी यांच्या घरी देखील नात्यासाठी मोठा हॉल आहे. खुद्द ईशा देओल हिने आईच्या घराची झलक चाहत्यांना दाखवली होती.

हेमा मालिनी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा त्यांनी बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज देखील चाहते हेमा मालिनी यांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहातात. हेमा मालिनी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील हेमा मालिनी यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.