Hema Malini | देओल कुटुंबाच्या सावत्र मुलांना एकत्र पाहताच हेमा मालिनी भावुक; म्हणाल्या…
Hema Malini - Dharmendra | देओल कुटुंबातील सावत्र भावंड एकत्र आल्यानंतर हेमा मालिनी भावुक होत म्हणाल्या...; कसे आहेत अभिनेते धर्मंद्र यांच्या दोन पत्नींच्या मुलांचे संबंध?
मुंबई | 2 7 ऑगस्ट 2023 : अभिनेते धर्मेंद्र यांच्या दोन पत्नींबद्दल आज सर्वांना माहिती आहे. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर असून, त्यांना चार मुलं आहे. पण प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांच्या दोन मुली कायम झगमगत्या विश्वापासून दूर असतात. धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव अभिनेत्री हेमा मालिनी असं आहे. तर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत. ईशा देओल आणि अहाना देओल अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत. पण देओल कुटुंबातील सावत्र भावंड कधीच एकत्र दिसली नाहीत. पण काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ईशा देओल हिने भाऊ सनी देओल यांच्या ‘गदर २’ सिनेमाच्या स्क्रिनचं आयोजन केलं होतं. तेव्हा सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल आणि अहाना देओल एकत्र आले.
सोशल मीडियावर देखील देओल कुटुंबाच्या चार भावंडांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. ज्यावर धर्मेंद्र यांनी देखील आनंद व्यक्त केला होता. आता यावर हेमा मालिनी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामुळे सर्वत्र देओल कुटुंबाची चर्चा रंगत आहे. शिवाय अभिनेते धर्मंद्र यांच्या दोन पत्नींच्या मुलांचे संबंधांबद्दल देखील मोठं सत्य समोर आलं आहे.
हेमा मालिनी म्हणाल्या, ‘माझ्यासाठी हे काही नवीन नाही. एक साधी गोष्ट आहे. अनेकदा सर्व जण घरी एकत्र येतात. पण कुटुंबातील कोणीही ही गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. म्हणून चाहत्यांना माहिती पडत नाही. आम्ही त्या लोकांपैकी नाही, जे कुटुंबातील प्रत्येक गोष्ट इन्स्टाग्रामवर पोस्ट करतात…’
पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘आम्ही एक कुटुंब आहोत. कुटुंबात अडचणी येत राहतात. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही विभक्त झालो आहोत. मुलं एकत्र दिसल्यामुळे चर्चांना उधाण आलं… आम्ही प्रत्येक जण आनंदी आहोत. मी देखील प्रचंड आनंदी आहे…’ सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केल्यानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यामध्ये प्रेम बहरलं. त्यानंतर कोणताही विचार न करता दोघांनी १९८० मध्ये लग्न केलं. लग्नानंतर एका वर्षानंतर हेमा मालिनी यांनी १९८१ साली ईशा देओल हिला जन्म दिला. त्यानंतर ४ वर्षांनंतर म्हणजे १९८५ साली हेमा मालिनी यांनी लहान मुलगी अहाना देओल हिला जन्म दिला.