हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल हिने घटस्फोटावर सोडलं मौन! सांगितली मोठी गोष्ट

Esha Deol : शाळेतील प्रेम लग्नापर्यंत पोहोचलं, पण नाही टिकला संसार, लग्नाच्या 11 वर्षांनंतर ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा घटस्फोट... भरत याच्यासोबत असलेल्या नात्यावर ईशा देओल हिने सोडलं मौन

हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल हिने घटस्फोटावर सोडलं मौन! सांगितली मोठी गोष्ट
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 1:00 PM

मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल हिचा 11 वर्षांचा संसार मोडला आहे. ईशा आणि पती भरत तख्तानी याला घटस्फोट दिला आहे. ईशा आणि भरत यांना दोन मुली आहेत. घटस्फोटानंतर खुद्द ईशा आणि भरत यांनी स्टेटमेंट जारी करत घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली. ईशा देओल हिच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

एका मुलाखतीत ईशा हिने भरत याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मी जमनाबाई नरसी स्कूलमध्ये होती आणि भरत वांद्रे याठिकाणी लर्नर्स अकॅडमीमध्ये शिक्षण घेत होता. आम्ही एका कॅस्केड नावाच्या इन्टर-स्कून स्पर्धेक भाग घेतला होता. तेव्हा ईशा हिने टिशूच्या एका तुकड्यावर स्वतःचा फोन नंबर लिहिला आणि भरत याला दिला…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तेव्हा फोनवर बोलणं फार कठिण होतं…. कॉलेजमध्ये देखील आम्ही एकत्र होतो…’ त्यानंतर 18 वर्षांची झाल्यानंतर ईशा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि भरत याच्यासोबत असलेलं अभिनेत्रीचं नातं संपलं. त्यानंतर जवळपास 10 वर्षांनंतर भरत – ईशा यांची पुन्हा भेट झाली.

हे सुद्धा वाचा

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये ईशा – भरत यांनी इस्कॉन मंदिरात लग्न केलं. पारंपरिक पद्धतीत ईशा – भरत याचं लग्न झालं. ईशा – भरत यांना दोन मुली देखील आहे. त्यांच्या मुलींचं नाव राध्या आणि मिराया असं आहे.

ईशा – भरत यांचा घटस्फोट

ईशा आणि भरत यांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे. ईशा हिने दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे…हा निर्णय आमच्या मुलींसाठी फार महत्त्वाचा होता.’ एवढंच नाही तर, नाजूक काळात, ईशा आणि भरत यांनी गोपनीयतेचे आवाहनही केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा आणि भरत यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

भरत तख्तानी याचे विवाहबाह्य संबंध…

भरत याचे परक्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा देखील दावा सोशल मीडिया युजरने केला आहे. एवढंच नाही तर, ईशा हिचा पती भरत याला न्यू इयरच्या दिवशी बेंगळुरू येथे एका पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा भरत याची गर्लफ्रेंड देखील त्याठिकाणी होती असं सांगण्यात येत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.