Hema Malini Birthday : 26 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत हेमा मालिनी यांचा रोमान्स, झेलल्या अनेक अडचणी

Hema Malini Birthday : २६ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स करताना हेमा मालिनी यांच्या समोर आल्या अनेक अडचणी, 'या' व्यक्तीने दिली साथ, त्यानंतर... वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांची चर्चा... त्यांनी अनेक सिनेमांमध्ये बजावली महत्त्वाची भूमिका...

Hema Malini Birthday : 26 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत हेमा मालिनी यांचा रोमान्स, झेलल्या अनेक अडचणी
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 7:29 AM

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 :  अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही त्यांचे सिनेमे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सांगायचं झालं तर हेमा मालिनी कायम सिनेमांच्या शुटिंग दरम्यान आलेले अनुभव सर्वांना सांगत असतात. एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता, ज्या त्यांनी शुटिंग दरम्यान झेलल्या होत्या. हेमा मालिनी यांनी अभिनेते राज कपूर यांच्यासोबत ‘सपनो का सौदागर’ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हा हेमा मालिनी तरुण होत्या आणि राज कपूर ४० वर्षांचे होते. मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या, ‘राज कपूर यांच्यासोबत काम करायला आनंद वाटत होता, पण रोमाँटिक सीन करताना अनेक अडचणी येत होत्या..’

राज कपूर यांच्यासोबत रोमाँटिक सीन करताना हेमा मालिनी यांनी अनेक अडचणी आल्या, तेव्हा सिनेमाचे दिग्दर्शक महेश कौल यांनी सपोर्ट केला. हेमा मालिनी यांना ‘सत्यम शिवम सुंदरम’ सिनेमात देखील एक भूमिका साकारण्याची ऑफर देण्यात आली होती. पण तेव्हा हेमा मालिनी यांनी भूमिका साकरण्यास स्पष्ट नकार दिला.

सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांनी चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. हेमा मालिनी आज बॉलिवूडपासून दूर असल्यातरी त्यांच्याबद्दल अनेक चर्चा रंगत असतात.हेमा मालिनी यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अनेक चाहत्यांना माहिती देखील नाहीत.

हेमा मालिनी यांची बॉलिवूडमधील कारकिर्द

हेमा मालिनी यांनी 1968 मध्ये ‘सपनो का सौदागर’ या सिनेमातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. त्यांनी राज कपूर यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. त्यानंतर हेमा मालिनी यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी अनेक एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

हेमा मालिनी यांच्या बॉलिवूड कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘बागबान’, ‘अंदाज’, ‘राजा जानी’, ‘पैसा’, ‘अलीबाबा आणि 40 चोर’, ‘जॉनी मेरा नाम’ यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले.

हेमा मालिनी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या, पण खासगी आयुष्यामुळे देखील हेमा मालिनी यांच्या अनेक चर्चा रंगत असतात. हेमा मालिनी फक्त अभिनेत्री नाही तर, शास्त्रीय नृत्यात देखील पारंगत आहेत. अनेक कार्यक्रमांत हेमा मालिनी त्यांची नृत्यकला सादर करताना दिसतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.