घटस्फोटानंतर अचानक ट्विस्ट, लेकीबद्दल हेमा मालिनी यांचं मोठं विधान; काय म्हणाल्या ईशा देओल बद्दल?
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल ही तूफान चर्चेत आहे. ईशा देओल ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलीये. नुकताच ईशा देओल हिने भरत याच्यासोबत घटस्फोट घेतलाय. ईशा देओल हिच्या घटस्फोटानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. आता नुकताच मोठा खुलासा करण्यात आलाय.
मुंबई : धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ईशा देओल हिच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगत होती. शेवटी ईशा देओल हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हे स्पष्ट केले की, भरत आणि तिने सहमतीने घटस्फोट घेतला आहे. ईशा देओल हिच्या घटस्फोटानंतर विविध चर्चा या सतत रंगताना दिसत आहेत. भरत तख्तानी याचे विवाहबाह्य संबंध असल्यानेच ईशा हिने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. ईशा देओल हिच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.
ईशा देओल हिच्या निधनानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी दु:खी असल्याचे देखील सांगितले जातंय. हेमा मालिनी यांनी नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना हेमा मालिनी या दिसल्या आहेत. हेमा मालिनी यांनी ईशा देओल हिच्याबद्दल देखील मोठे विधान केले आहे. मुलीच्या करिअरबद्दल बोलताना हेमा मालिनी या दिसल्या आहेत.
हेमा मालिनीला विचारण्यात आले की, ईशा देओल ही भविष्यात राजकारणात येऊ शकते. यावर बोलताना हेमा मालिनी या म्हणाल्या की, होय जर तशी तिची इच्छा असेल तर नक्कीच…ईशाला राजकारणाची आवड आहे. काही वर्षांमध्ये ईशा देओल ही राजकारणात प्रवेश करू शकते, असेही हेमा मालिनी यांनी म्हटले आहे. आता हेमा मालिनी यांनी हे स्पष्ट केलंय की, भविष्यात ईशा राजकारणात येऊ शकते.
हेमा मालिनी या पुढे म्हणाल्या की, मला धर्मेंद्र यांचा खूप जास्त सपोर्ट मिळतो. ते मुंबईतील घर सांभाळतात आणि मी मथुरेला जाऊ-येऊ शकते. माझे परिवार माझ्यासोबत आहे. मी बऱ्याच वेळा येते आणि लगेचच मथुरेला जाते. मी जे काही करते, त्यावर नेहमीच धर्मेंद्र जी खूप खुश असतात. बऱ्याच वेळा ते माझ्यासोबत मथुरेला देखील येतात.
भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर ईशा देओल ही सतत चर्चेत असणारे नाव बनले आहे. आता लवकरच ईशा देओल ही राजकारणात धमाका करणार असल्याचे स्पष्ट आहे. लोकसभा निवडणूक ईशा देओल ही लढू शकते अशीही चर्चा एक रंगताना दिसत आहे. ईशा देओल ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. ईशा देओल ही दोन मुली देखील आहेत.