Dharmendra सोबत लग्नासाठी तयार नव्हत्याच हेमा मालिनी; ‘त्या’ घटनेनंतर घ्यावा लागला मोठा निर्णय

Dharmendra | धर्मेंद्र यांच्यसोबत लग्नासाठी कधीही तयार नव्हत्या हेमा मालिनी, पण विवाहित पुरुषासोबत का करावं लागलं लग्न? धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याचं मोठं सत्य समोर...

Dharmendra सोबत लग्नासाठी तयार नव्हत्याच हेमा मालिनी; 'त्या' घटनेनंतर घ्यावा लागला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 12:15 PM

मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या लग्नाला आज अनेक वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांच्या लग्नाला ४३ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आजही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याच्या चर्चा रंगत आहेत. धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे वडील असताना देखील हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते. सुरुवातीला हेमा मालिनी यांचा धर्मंद्र यांच्यासोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार होता. पण अखेर हेमा मालिनी लग्नासाठी तयार झाल्या आणि सर्वांच्या विरोधात जात धर्मंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचा कुटुंबियांसोबतच अनेकांनी विरेध दर्शवला. दरम्यान एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.

हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करायच नव्हतं…

सिनी ग्रेव्हाल यांच्या शोच्या एका एपिसोडमध्ये हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं. हेमा मालिनी यांनी कधीच धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. धर्मेंद्र यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करणार असा निर्णय हेमा मालिनी यांनी घेतला होता.

हेमा मालिनी म्हणाल्या, ‘धर्मेंद्र प्रचंड हँडसम दिसत होते. म्हणजे त्यांच्यासोबतच लग्न करेल.. मी अस कधी विचार देखील केला नव्हता. धर्मेंद्र यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करेल असा विचार मी केला होता. पण सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, आम्ही जास्त काळ एकत्र राहयला लागलो. शुटिंगसाठी आम्ही मुंबई बाहेर देखील असायचो..’

हे सुद्धा वाचा

पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘दोघांमधील नातं घट्ट झालं होतं. एकमेकांप्रती आपुलकी वाढली होती.’ अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न केलं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत, पण आजही धर्मेद्र यांच्या घराची पायरी हेमा मालिनी चढल्या नाहीत. लग्नानंतर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासाठी नवीन घर घेतलं होतं.

सांगायचं झालं तर, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये लग्न केलं. लग्नानंतर एका वर्षानंतर हेमा मालिनी यांनी १९८१ साली ईशा देओल हिला जन्म दिला. त्यानंतर ४ वर्षांनंतर म्हणजे १९८५ साली हेमा मालिनी यांनी लहान मुलगी अहाना देओल हिला जन्म दिला. पण महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबासोबत नसतं.

मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.